आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 178 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 21 लाख मात्रांचे लसीकरण

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.62%,

गेल्या 24 तासात 6,561 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 77,152

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.99%

Posted On: 03 MAR 2022 9:20AM by PIB Mumbai

 गेल्या 24 तासात  21  (21,83,976)  लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 178  (1,78,02,63,222)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,05,41,983 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,757

2nd Dose

99,70,032

Precaution Dose

41,99,279

FLWs

1st Dose

1,84,09,861

2nd Dose

1,74,48,537

Precaution Dose

62,90,304

Age Group 15-18 years

1st Dose

5,50,25,490

2nd Dose

2,87,35,449

Age Group 18-44 years

1st Dose

55,20,71,254

2nd Dose

44,61,31,357

Age Group 45-59 years

1st Dose

20,23,15,853

2nd Dose

18,05,83,661

Over 60 years

1st Dose

12,64,47,292

2nd Dose

11,24,68,351

Precaution Dose

97,64,745

Precaution Dose

2,02,54,328

Total

1,78,02,63,222

 

 

गेल्या 24 तासांत 14,947 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,23,53,620 झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.62% झाला आहे. 

गेल्या 24 तासात 6,561 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  77,152 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.18% आहे. 

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 8,82,953  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77  (77,00,50,005) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.99% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.74% आहे.

***

PS/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1802554) Visitor Counter : 207