वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग “मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड” या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनार आयोजित करणार


उद्घाटन सत्राला पंतप्रधान करणार संबोधित

Posted On: 02 MAR 2022 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मार्च 2022

 

भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुसरत वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचा उद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभाग (DPIIT) येत्या 3 मार्च रोजी “मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड” या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनार आयोजित करणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये भारताच्या शतकपूर्तीकडे जाण्याचा  एक मार्ग आखून दिलेला असून  त्यामध्ये प्रगती व रोजगारनिर्मितीसाठी उत्पादनक्षमतेतील वाढ हा एक आवश्यक घटक मानला गेला आहे. या वेबिनारमध्ये भारतातील उत्पादनक्षमतेतील आमूलाग्र बदल आणि त्यामुळे ट्रिलियन डॉलर्सच्या निर्यातीच्या उद्दिष्टाकडे चाललेली वाटचाल, तसेच अर्थव्यवस्थेला सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचा यासाठी होणारा उपयोग, इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी “मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड” यासंदर्भात  केंद्रीय अर्थसंकल्पाशी  याची सांगड  तसेच वेबिनारमधून असलेल्या अपेक्षांबद्दल सर्व सहभागींसमोर एक विशेष भाषण करतील. केंद्रीय वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल वेबिनारच्या  समारोप सत्राला संबोधित करतील.  करतील.

उद्घाटनाच्या सत्रानंतर लागोपाठ तीन सत्रे होतील :

  1. भारतातील उत्पादनातील आमूलाग्र बदल @100
  2. निर्यातीच्या ट्रिलियन डॉलर्स उद्दिष्टपूर्ततेसाठी धोरण आखणी
  3. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचे इंजिन म्हणून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांचा उपयोग कसा होईल यावर चर्चा

समारोपाच्या सत्रात तीनही सत्रांचे मॉडरेटर असणारे उद्योजक कृती योजनांचे सादरीकरण करतील. यामधून वेबिनारचे फलित तसेच पुढील योजनांचा आराखडा सर्वांसमोर ठेवला जाईल.

 

* * *

N.Chitale/U.Raikar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802320) Visitor Counter : 246