उपराष्ट्रपती कार्यालय
शिक्षण क्षेत्रात भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
Posted On:
01 MAR 2022 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मार्च 2022
भारताला शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा विश्वगुरू बनवण्याचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आवाहन केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 हे या दिशेने टाकलेले एक पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. ते आज गुंटूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. भारतीय संस्कृतीमध्ये मूळे असलेल्या मूल्याधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा या धोरणाचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.
व्यक्तीमधील श्रेष्ठत्व ओळखणे आणि त्याचा योग्य सन्मान करणे हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. इतरांना सर्वोच्च प्रावीण्य प्राप्त करण्यासाठी आणि नवी शिखरे सर करण्यासाठी प्रेरित करणे हा देखील तिचा उद्देश आहे, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. भारतातील युवा वर्गामध्ये गुणवत्तेची कमतरता नाही आणि ही गुणवत्ता ओळखणे आणि त्यांच्यामध्ये आवश्यक असलेले कौशल्य निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
शिक्षकांनी अध्यापन अधिक जास्त संवादात्मक, जास्त सखोल करण्यावर आणि विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे एक अतिशय आवडीचा अनुभव वाटेल, अशा प्रकारे शिकवण्यावर भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदींची प्रत्येक शिक्षक आणि शाळा प्रशासकांनी तातडीने अंमलबजावणी करावी, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1802161)
Visitor Counter : 209