राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले प्रेसिडेंट्स इस्टेटमध्ये आरोग्य वनमचे उद्घाटन

Posted On: 01 MAR 2022 2:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मार्च 2022

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज प्रेसिडेंट्स इस्टेमध्ये नव्याने विकसित केलेल्या आरोग्य वनमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. 6.6 एकरमध्ये पसरलेल्या या जागेत आरोग्य मुद्रा स्थितीत बसलेल्या मानवाच्या आकारात आरोग्य वनम विकसित करण्यात आले आहे. यामध्ये आयुर्वेदिक उपचारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुमारे 215 औषधी झुडपे आणि वनस्पतींचा समावेश आहे. त्याचबरोबर या वनममध्ये कारंजे, योगासने करण्यासाठी मंच, पाण्याचे कालवे आणि कमळे असलेली तळी आणि एक रमणीय दर्शनस्थळ आहे. आयुर्वेदिक वनस्पती आणि त्यांचे मानवी शरीरासाठी असणारे फायदे यांच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या आरोग्य वनमची संकल्पना आकाराला आली आहे. हे वनम आता जनतेला पाहण्यासाठी खुले आहे.

 

* * *

Jaydevi PS/S.Patil//D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802075) Visitor Counter : 210