रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरात, 1 मार्च ते 7 मार्च 2022 या कालावधीत जनऔषधी दिवस सप्ताह पाळण्यात येणार


चौथ्या जनऔषधी दिवसाची संकल्पना आहे: “जनऔषधी-लोकोपयोगी”

Posted On: 28 FEB 2022 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2022


औषध निर्मिती विभागाच्या अखत्यारीतील फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडिया (PMBI) च्या वतीने देशभरातील सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील विविध ठिकाणी आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित करून 4 था जनऔषधी दिवस साजरा केला जाणार आहे.

या योजनेची वैशिष्ट्ये आणि कामगिरी याबद्दल चर्चा करण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांचे  मालक, लाभार्थी, राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, फार्मासिस्ट, जनऔषधी मित्र आणि इतर हितधारक यांच्याशी थेट समन्वयाने आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातील.हे  सर्व उपक्रम "स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केले जातील. 75 ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. देशभरात आयोजित केले जाणारे दैनंदिन उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

Sl. No.

Date

Activity

1.

01.03.2022

Jan AushadhiSankalpPadyatra

2.

02.03.2022

Matri Shakti Samman / Swabhiman

3.

03.03.2022

Jan Aushadhi Bal Mitra

4.

04.03.2022

Jan Aushadhi Jan Jagran Abhiyan

5.

05.03.2022

Aao Jan AushadhiMitra Bane

6.

06.03.2022

Jan Aushadhi Jan Arogya Mela (Health Checkup camps)

7.

07.03.2022

Jan Aushadhi Diwas

 

"जनऔषधी दिवस" चा मुख्य कार्यक्रम 7 मार्च 2022(सोमवार) रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायने आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सर्वांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, नोव्हेंबर 2008 मध्ये भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या औषध निर्मिती  विभागाकडून प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) सुरू करण्यात आली.

31 जानेवारी 2022 पर्यंत, जनौषधी दुकानांची  संख्या 8,675 पर्यंत वाढली आहे. प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने अंतर्गत, देशातील सर्व 739 जिल्हे समाविष्ट आहेत. या योजनेमुळे, देशभरात  कानाकोपऱ्यातील लोकांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध केली जातात.

 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801817) Visitor Counter : 297