रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
दुचाकींची वाहतूक करण्यासाठी कमाल तीन डेक ठेवण्यासाठी रिजिड वाहने आणि ट्रेलर्ससाठी अधिसूचना जारी
प्रविष्टि तिथि:
27 FEB 2022 10:37AM by PIB Mumbai
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 25 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय मोटर वाहन नियम 1989मध्ये सुधारणा केली आहे. ज्यामुळे रिजिड वाहने(वाहतुकीदरम्यान माल स्थिर ठेवणारी) आणि ट्रेलर्सना दुचाकींची वाहतूक करण्यासाठी जास्तीत जास्त तीन डेक ठेवता येतील आणि चालकाच्या केबिनच्यावर मालाचा भार असलेला भाग डोकावणार नाही.
यामुळे दुचाकींची वाहतूक करणाऱ्या वाहनाची क्षमता 40 ते 50 टक्क्यांनी वाढेल.
***
ST/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801560)
आगंतुक पटल : 299