युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पॅरालिम्पिकमध्ये दुहेरी पदकविजेता खेळाडू मरियप्पन थंगवेलूने “मीट दी चॅम्पीअन्स” उपक्रमासाठी मानले पंतप्रधानांचे आभार
प्रविष्टि तिथि:
24 FEB 2022 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2022
पॅरालिम्पिक सुवर्ण आणि रौप्य पदक विजेता खेळाडू मरियप्पन थंगवेलू याने सालेम येथील होली अँजल्स गर्ल्स शाळेला भेट दिली. शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये क्रीडासंस्कृती रुजवण्याची आणि संतुलित आहाराविषयी माहिती देण्याचा उपक्रम सुरु केल्याबद्दल त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

स्थानिक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर, मरियप्पनने लहान मुलांसोबत व्हॉलीबॉल खेळला आणि तसेच कोर्टवर टेनिस कौशल्याची चुणूक दाखवली.

शाळा भेटीचा अनोखा उपक्रम शिक्षण मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांनी संयुक्तपणे आयोजित केली आहे, जिथे ऑलिंपियन आणि पॅरालिम्पियन त्यांचे स्वतःचे अनुभव, जीवनविषयक मार्गदर्शन, योग्य आहाराबद्दलच्या टिप्स शेअर करतात आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात.

* * *
S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800923)
आगंतुक पटल : 274