आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या समग्र कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 176.52 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 30.49 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.46%,

गेल्या 24 तासात 14,148 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 1,48,359

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 1.60%

Posted On: 24 FEB 2022 9:37AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासात 30.49 (30,49,988) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 176.52 (1,76,52,31,385) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 2,01,49,530 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,04,01,131

2nd Dose

99,60,537

Precaution Dose

41,13,480

FLWs

1st Dose

1,84,08,724

2nd Dose

1,74,30,375

Precaution Dose

60,92,569

Age Group 15-18 years

1st Dose

5,42,63,490

2nd Dose

2,47,48,744

Age Group 18-44 years

1st Dose

55,10,97,609

2nd Dose

43,99,93,963

Age Group 45-59 years

1st Dose

20,21,57,669

2nd Dose

17,92,34,856

Over 60 years

1st Dose

12,63,13,709

2nd Dose

11,16,53,849

Precaution Dose

93,60,680

Precaution Dose

1,95,66,729

Total

1,76,52,31,385

 

गेल्या 24 तासात 30,009 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून) वाढून 4,22,19,896.झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.46% झाला आहे.

गेल्या 24 तासात 14,148 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,48,359 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.35%आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 11,55,147 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 76.35 (76,35,69,165) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.60% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.22% आहे.

***

ST/SK/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800705) Visitor Counter : 192