पंतप्रधान कार्यालय
हिमाचल प्रदेशातील कारखाना दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
दुर्घटनाग्रस्तांसाठी पीएमएनआरएफ च्या माध्यमातून मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
22 FEB 2022 2:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशमधील कारखाना दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"हिमाचल प्रदेशातील ऊना येथे एका कारखान्यात घडलेली दुर्घटना दु:खद आहे. यात जीव गमवावा लागलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. यासोबतच दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो: पंतप्रधान"
"पीएमएनआरएफ द्वारे हिमाचल प्रदेशातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जातील. जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1800271)
आगंतुक पटल : 241
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam