ग्रामीण विकास मंत्रालय

ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते उद्या ग्रामीण संपर्कव्यवस्थेचा जीआयएस डेटा प्रसिद्ध होणार


800,000 पेक्षा अधिक ग्रामीण सुविधा,एक दशलक्ष पेक्षा अधिक वस्त्या आणि 25,00,000 किमीपेक्षा अधिक ग्रामीण रस्त्यांबाबत जीआयएस मंचाचा वापर करून संकलित आणि डिजिटायझेशन केलेला जीआयएस डेटा जनतेसाठी उपलब्ध करून दिला जाईल

Posted On: 21 FEB 2022 7:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2022

 

केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह 22 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटर   येथे ग्रामीण संपर्कजोडणीविषयीचा जीआयएस डेटा प्रसिद्ध करतील.

देशभरातील संपर्करहित वस्त्यांना सर्व ऋतूंमध्ये सुरळीत संपर्कव्यवस्था पुरवण्याच्या उद्देशाने  प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY) सन 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशामध्ये  विविध मार्ग आणि प्रमुख ग्रामीण जोडरस्त्यांमध्ये सुधारणा  आणि एकत्रीकरण देखील समाविष्ट करण्यात आले. ही योजना सुरु झाल्यापासून 7.83 लाख किमी रस्त्यांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आणि 2.69 लाख कोटी रुपये खर्चासह 6.90 लाख किमी रस्ते बांधण्यात आले आहेत.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून, योजनेसाठी विकसित केलेल्या जीआयएस प्लॅटफॉर्मचा वापर करून  800,000 पेक्षा अधिक  ग्रामीण सुविधा , दहा लाखांहून अधिक वस्त्या आणि 25,00,000 पेक्षा अधिक किमी ग्रामीण रस्त्यांचा डेटा संकलित  करून त्याचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे.  संकलित ग्रामीण संपर्कयव्यवस्थेचा हा जीआयएस डेटा आता सार्वजनिक केल्यामुळे लोकांसाठी उपलब्ध असेल.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची नोडल अंमलबजावणी संस्था NRIDA, 3 प्रसिद्ध जीआयएस कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करणार आहे आणि सार्वजनिक क्षेत्रात  ग्रामीण संपर्कव्यवस्थेचा जीआयएस डेटा प्रसिद्ध करण्यासाठी गती शक्तीबरोबर सहकार्य करणार आहे.
 

* * *

R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1800123) Visitor Counter : 202