राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महासागरांच्या शाश्वत वापरासाठी सहकार्यात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी "प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास' आवश्यक असल्याची भारताची भूमिका आहे -राष्ट्रपती


विशाखापट्टणम येथे फ्लीट रिव्ह्यू-2022 ला राष्ट्रपती उपस्थित

प्रविष्टि तिथि: 21 FEB 2022 6:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 फेब्रुवारी 2022

 

महासागरांच्या शाश्वत वापरासाठी सहकार्यात्मक उपायांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी  ‘प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास’ आवश्यक आहे अशी भारताची भूमिका  आहे, असे  राष्ट्रपती  राम नाथ कोविंद म्हणाले. ते आज (21 फेब्रुवारी 2022) आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे प्रेसिडेंशियल फ्लीट रिव्ह्यू-2022 च्या प्रसंगी बोलत होते. राष्ट्रपती म्हणाले की, बहुतांश जागतिक व्यापार  हिंद महासागरातून होतो.  

आपल्या व्यापार आणि ऊर्जा विषयक  गरजा महासागराच्या माध्यमातून भागवल्या जातात. म्हणूनच, समुद्र आणि सागरी क्षेत्राची सुरक्षा ही अतिशय आवश्यक आहे. भारतीय नौदलाची निरंतर सतर्कता, घटनांना तत्परतेने प्रतिसाद आणि अथक परिश्रम या संदर्भात कमालीचे यशस्वी झाले आहेत.

कोविड-19 महामारीच्या काळात भारतीय नौदल ‘मिशन सागर’ आणि ‘समुद्र सेतू’ अंतर्गत जगातील विविध भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि परदेशी नागरिकांना औषधांचा पुरवठा आणि सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात   मित्र राष्ट्रांना मदत करत आहे असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

विशाखापट्टणमच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे लक्ष वेधत  राष्ट्रपती म्हणाले की, हे बंदर अनेक शतकांपासून महत्त्वाचे बंदर आहे. भारतीय नौदलाच्या पूर्व नौदल कमांडचे मुख्यालय विशाखापट्टणम येथे आहे, यावरून त्याचे सामरिक महत्त्व अधोरेखित होते. 1971 च्या युद्धात विशाखापट्टणमने गौरवपूर्ण योगदान दिल्याचे ते म्हणाले. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील नौदल नाकेबंदी आणि पाकिस्तानची पाणबुडी ‘गाझी’ बुडवताना पूर्व नौदल कमांडने दाखवलेल्या शौर्याचे त्यांनी स्मरण केले. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का होता असे ते म्हणाले.

महामारीमुळे उदभवलेल्या सर्व आव्हानांवर आणि निर्बंधांवर मात करत फ्लीट रिव्ह्यूच्या शानदार आयोजनाबद्दल राष्ट्रपतींनी भारतीय नौदलाचे अभिनंदन केले.

सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर म्हणून राष्ट्रपती त्यांच्या कार्यकाळात एकदा ‘प्रेसिडेंट्स  फ्लीट रिव्ह्यू’चा भाग म्हणून भारतीय नौदल ताफ्याचा आढावा घेतात.

 

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा


* * *

M.Iyengar/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1800090) आगंतुक पटल : 326
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam