कृषी मंत्रालय
एक्स्पो2020 दुबई येथे भारताने स्टार्टअप आणि ‘एफपीओ’ना कृषी आणि अन्न प्रक्रिया धोरणांचा लाभ घेण्यासाठी केले आमंत्रित
इंडिया पॅव्हेलियनमध्ये ‘अन्न, कृषी आणि उपजीविका’ पंधरवडा दरम्यान ‘बाजरी खाद्य महोत्सवा’चे करणार आयोजन
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2022 4:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2022
एक्स्पो 2020 दुबई मध्ये देशाची गुंतवणूक- स्नेही धोरणे आणि कृषी आणि संबंधित क्षेत्रातील वाढीच्या संधी सादर करण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ अभिलाक्ष लिखी यांनी स्टार्टअप आणि एफपीओ (शेतकरी उत्पादक संघटना) यांना त्यांचे प्रस्ताव मंत्रालयाकडे सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि त्यांना समभाग अनुदान, व्यवस्थापन खर्च आणि इतर सहाय्य प्रदान कारण्याबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले . एक्स्पो 2020 दुबई मधील इंडिया पॅव्हेलियनमध्ये ‘अन्न, कृषी आणि उपजीविका’ पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. लिखी बोलत होते.
‘अन्न, कृषी आणि उपजीविका’ पंधरवड्यामध्ये (17 फेब्रुवारी ते 2 मार्च) विविध सत्रांचा समावेश असेल. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, सहकार मंत्रालयाच्या प्रतिनिधींच्या अध्यक्षतेखाली ही सत्रे होतील. या व्यतिरिक्त, बाजरी, अन्न प्रक्रिया, फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि सेंद्रिय शेती या प्रमुख संकल्पना आणि या क्षेत्रांमधील गुंतवणुकीच्या अमाप संधीच्या अनुषन्गाने या पंधरवड्यादरम्यान अनेक उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

डॉ. लिखी म्हणाले, "एक्स्पो 2020 मधील आपल्या सहभागाचा प्राथमिक उद्देश छोट्या आणि अल्प भूधारक शेतकर्यांना लाभ मिळवून देणे हा आहे, ज्यांना उत्पादन खर्चात बचत, सामूहिक शेती आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी समन्वय साधण्यासाठी एकत्र येण्यासाठी अधिक मंचांची आवश्यकता आहे."
कृषी आणि संलग्न क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि एकूण निर्यातीमध्ये सुमारे 19% वाटा आहे. बुधवारी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या दुसऱ्या अंदाजानुसार,2021-22 पीक वर्षासाठी (जुलै-जून) 316.06 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
* * *
S.Bedekar/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1799283)
आगंतुक पटल : 231