राष्ट्रपती कार्यालय
चार देशांच्या राजदूतांनी राष्ट्रपतींना सादर केली परिचय पत्रे
प्रविष्टि तिथि:
16 FEB 2022 2:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2022
राष्ट्रपती भवनात आज (16 फेब्रुवारी, 2022) टांझानिया संयुक्त प्रजासत्ताकाचे उच्चायुक्त तसेच जिबूती प्रजासत्ताक, सर्बिया प्रजासत्ताक आणि उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताकच्या राजदूतांनी सादर केलेली परिचय पत्रे, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारली. खालील उच्चायुक्त/राजदूतांनी परिचय पत्रे सादर केली :
- महामहिम अनिसा के. म्बेगा, टांझानिया संयुक्त प्रजासत्ताकच्या उच्चायुक्त
- महामहिम इस्से अब्दिल्लाही असोवेह, जिबूती प्रजासत्ताकचे राजदूत
- महामहिम सिनिसा पेविक, सर्बिया प्रजासत्ताकचे राजदूत
- महामहिम स्लोबोदान उझुनोव, उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताकचे राजदूत
परिचय पत्र सादर केल्यानंतर राष्ट्रपतींनी चार राजदूतांशी स्वतंत्रपणे संवाद साधला. त्यांच्या नियुक्तीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि भारताचे या देशांसोबत असलेले सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंध तसेच या प्रत्येक देशाचे भारतासोबत असलेले बहुआयामी संबंध अधोरेखित केले. राष्ट्रपतींनी त्यांना द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी यश मिळण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या देशातील नागरिकांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपतींनी उच्चायुक्त आणि राजदूतांमार्फत त्यांच्या राष्ट्रप्रमुखांना वैयक्तिक शुभेच्छाही दिल्या. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजदूतांनी भारतासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी एकत्रित काम करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1798745)
आगंतुक पटल : 223