खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात एप्रिल-डिसेंबर 2021-22 या कालावधीत खनिज उत्पादनात एकूण 16 टक्के वाढ

Posted On: 16 FEB 2022 11:53AM by PIB Mumbai

खाण आणि उत्खनन क्षेत्राच्या खनिज उत्पादनाचा निर्देशांक डिसेंबर 2021 या महिन्यासाठी (आधार: 2011-12=100)  120.3 इतका नोंदविण्यात आला असून तो डिसेंबर 2020 मधील उत्पादन स्तराच्या तुलनेत 2.6% अधिक आहे. भारतीय खाण विभागाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, एप्रिल-डिसेंबर, 2021-22 या कालावधीतील खनिज उत्पादन निर्देशांकाच्या एकूण  वृद्धीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत त्यात 16.0% वाढ झाली आहे.

 
डिसेंबर 2021 मध्ये महत्त्वाच्या खनिजांचा  उत्पादन स्तर पुढीलप्रमाणे होता  : कोळसा 748 लाख टन, लिग्नाइट 39 लाख टन, नैसर्गिक वायू (वापरलेला) 2814 दशलक्ष घन चौरस मी., पेट्रोलियम (कच्चे ) 25 लाख टन, बॉक्साइट 2492 हजार टन, क्रोमाईट 384 हजार टन, घनरूप  तांबे 10 हजार टन, सोने 106 किलो, लोहखनिज 209 लाख टन, घनरूप शिसे  28 हजार टन, मॅंगनीज धातू 273 हजार टन, घनरूप झिंक 126 हजार टन, चुनखडी 309 लाख टन, फॉस्फोराईट 110 हजार टन, मॅग्नेसाइट 11 हजार टन आणि हिरे  70 कॅरेट . 


Jaydevi PS/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1798719) Visitor Counter : 323


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi , Tamil