रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन (NMP)-22 मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, 23 प्रमुख पायाभूत विकास प्रकल्प, 35 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक्स (MMLPs) आणि इतर महामार्ग प्रकल्प प्रस्तावित

Posted On: 15 FEB 2022 4:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी 2022

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MORTH) "पंतप्रधान  गतिशक्ती राष्ट्रीय  मास्टर प्लॅन  (NMP)" अंतर्गत लक्षणीय प्रगती केली आहे.  देशभरात मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी आणि शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारणे हे याचे उद्दिष्ट आहे.

गती शक्ती हा  एक डिजिटल मंच आहे, जो औद्योगिक समूह  आणि आर्थिक नोड्ससाठी पायाभूत कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीसाठी रेल्वे आणि रस्ते मार्गासह  16 मंत्रालयांना एकत्र आणेल.

पंतप्रधान  गति शक्ती राष्ट्रीय  मास्टर प्लॅनचा एक भाग म्हणून, मंत्रालयाने भारतमाला योजना आणि मंत्रालयाच्या इतर योजनांचा  भाग म्हणून 22 ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, 23 इतर प्रमुख पायाभूत  प्रकल्प आणि इतर महामार्ग प्रकल्प तसेच  35 मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (MMLPs) विकसित करण्याची योजना आखली आहे. काही प्रमुख द्रुतगती मार्ग आणि कॉरिडॉरचे काम सुरु आहे, यामध्ये  दिल्ली – मुंबई एक्सप्रेसवे, अहमदाबाद – धोलेरा एक्सप्रेसवे, दिल्ली-अमृतसर-कटरा एक्सप्रेसवे यांचा समावेश आहे.

काही प्रमुख  पायाभूत विकास  प्रकल्प, ज्यांचे काम सुरु  आहेत, त्यात झोजिला बोगदा (लडाख) आणि धुबरी-फुलबारी (मेघालय) दरम्यान ब्रह्मपुत्रेवरील 4-पदरी पुलाचे बांधकाम यांचा समावेश आहे.

मंत्रालयाने, त्यांच्या एनएचएआय /एनएचएलएमएल  आणि एनएचआयडीसीएल या  अंमलबजावणी संस्थाद्वारे, भारतमाला परियोजन टप्पा I अंतर्गत विकासासाठी निवडलेल्या  35 मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी) प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या कामात गती ठेवली आहे. याशिवाय, तीन एमएमएलपीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत: 1. एमएमएलपी  नागपूर: सिंदी गावात जेएनपीटीच्या  भागीदारीतून विकसित केले जात आहे 2. एमएमएलपी  चेन्नई  3.एमएमएलपी बंगळुरू यांचा समावेश आहे.

पीएम गति शक्ती अंतर्गत प्रकल्पांच्या संदर्भात झालेल्या प्रगतीबाबत  लोकांना अवगत  करण्यासाठी मंत्रालयाने गेल्या दोन आठवड्यांत सोशल मीडियावर एक विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत, मंत्रालयाने ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि कू सारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आणि कॉरिडॉर, मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क (एमएमएलपी), रोपवे आणि इतर प्रमुख पायाभूत सुविधा  प्रकल्पांच्या सद्यस्थितीबद्दल जनतेला माहिती दिली.

 

  

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798508) Visitor Counter : 204