सांस्कृतिक मंत्रालय
‘भारतातील वस्तुसंग्रहालयांचा कायापालट’ या विषयावरील अशा प्रकारच्या पहिल्याच जागतिक शिखर परिषदेचे उद्या हैदराबाद येथे केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Posted On:
14 FEB 2022 2:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2022
केंद्रीय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय 15 आणि 16 फेब्रुवारी 2022 रोजी ‘भारतातील वस्तुसंग्रहालयांचा कायापालट’ या विषयावरील अशा प्रकारच्या पहिल्याच दोन दिवसीय जागतिक शिखर परिषदचे आयोजन करत आहे. ही परिषद हैदराबाद येथे पार पडणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. देशातील तसेच ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, युनायटेड किंगडम या देशांमधील प्रतिनिधी या सहभागी होतील. ही परिषद दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडेल आणि सर्वांसाठी खुली असेल. 'स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत देशातील तसेच परदेशातील वस्तुसंग्रहालय विकसनाच्या आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती, विषय तज्ज्ञ अभ्यासक या संदर्भातील सर्वोत्तम पद्धती आणि धोरणे यांच्याबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत.
भारतातील हजारो वस्तुसंग्रहालये केवळ आपले सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन आणि संवर्धन करण्यासाठीच नसून पुढील पिढ्यांच्या शिक्षणासाठी आहे, असे उद्गार सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी या परिषदेबद्दल बोलताना काढले.
गेल्या सात वर्षांपासून एग्युमेंटेड रिएलिटी आणि व्हर्च्युअल रिएलिटी यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेत प्रदर्शने आणि सामग्रीच्या माध्यमातून नवीन वस्तुसंग्रहालये उभारली जाण्यावर भर देण्यात येत आहे. असेही त्यांनी नमूद केले.
या ऑनलाईन शिखर परिषदेत वास्तुरचना आणि कार्यविषयक गरजा; व्यवस्थापन; संकलन (संवर्धन आणि जतन यांसह) आणि शिक्षण तसेच प्रेक्षक सहभाग या चार विस्तृत संकल्पनांचा समावेश करण्यात येईल:
या परिषदेत सहभागी होण्यासाठी कृपया या संकेतस्थळाचा वापर करा: https://www.reimaginingmuseumsinindia.com/
S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1798258)