रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्हिस्टाडोम गाड्यांची सद्यस्थिती

Posted On: 11 FEB 2022 5:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022

रेल्वे विभागाच्या प्रदेश रेल्वेसेवेत सध्या व्हिस्टाडोम प्रकारचे डबे समाविष्ट असलेल्या 45 रेल्वेगाड्यांचे परिचालन सुरु आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अखत्यारीत धावणाऱ्या मुंबई-पुणे एक्सप्रेस, मुंबई-मडगाव एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन एक्सप्रेस या तीन गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी व्हिस्टाडोम प्रकारचे डबे जोडण्यात आले आहेत. देशभरात अशा प्रकारचे डबे जोडून धावणाऱ्या सर्व गाड्यांची तपशीलवार माहिती खालील तक्त्यात दिली आहे:- 

Sl No.

Zonal Railway

Details of Trains

1.

Central Railway

11007/08 Mumbai-Pune Express 12051/52 Mumbai-Madgaon Express 12123/24 Deccan Queen Express

2.

East Coast Railway

18551/52      Visakhapatnam-Kirandul      Express

(Upto Araku)

3.

Northeast Frontier Railway

15777/78 Alipurduar – New Jalpaiguri Express 15887/88 Guwahati-Badarpur Express 15907/08 Tinsukia-Naharlagun Express 52593/95/98/44, 52541, 52540, 52556

Darjeeling Himalayan Railway (NG)

4.

Western Railway

20947/48 Ahmedabad-Kevadiya Express 20949/50 Ahmedabad-Kevadiya Express 52965/66 Mhow-Patalpani-Kalakund(MG)

09501/02, 09071/72 Billimora-Waghai(NG)

5.

South Western Railway

16539/40 Yeswantpur-Mangalore Express 16515/16 Yeswantpur-Karwar Express 16575/76 Yeswantpur-Mangalore Express

16579/80 Yeswantpur-Shivamogga Express

6.

Northern Railway

52453/54, 52459/60 Kalka - Shimla Express

7.

North Eastern Railway

05319/20 Mailani-Bichia Special(MG)

व्हिस्टाडोम डबे जोडून धावणाऱ्या गाड्यांसाठी प्रेक्षणीय निसर्ग सौंदर्य असणारे मार्ग निवडले जातात. तसेच, व्हिस्टाडोम प्रकारच्या डब्यांची उपलब्धता, त्यांची परिचालनविषयक व्यवहार्यता, प्रवासी संख्येची मर्यादा, दिवस असताना होणारा गाडीचा प्रवास आणि प्रवाशांकडून आलेली मागणी या घटकांचा विचार करून मगच एखाद्या गाडीला व्हिस्टाडोम डबे जोडण्यात येतात.

 केंद्रीय रेल्वे, दळणवळण तसेच इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्य सभेत लिखित उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797691) Visitor Counter : 254
Read this release in: English , Urdu , Bengali , Tamil