वस्त्रोद्योग मंत्रालय
वस्त्रोद्योग क्षेत्रातील कारागिरांना दर महिन्यात किमान एक हजार रुपये अधिक उत्पन्न होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी सुसंवादी पद्धतीने काम करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी देशातील प्रमुख डिझायनर्सना दिला
राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेच्या 30,000 माजी विद्यार्थ्यांना हस्तकला परिसंस्थेत बदल घडवून आणण्याचे केले आवाहन
प्रत्येक माजी विद्यार्थ्याने एका कलाकाराला दत्तक घ्यावे आणि समाजाच्या वंचित वर्गाला संरेखन,व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत शिक्षित करण्यासाठी वेळ द्यावा : पीयूष गोयल
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सुप्रसिध्द डिझायनर्ससोबत बैठक
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2022 4:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 11 फेब्रुवारी 2022
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज वस्त्रांची संरेखने करणाऱ्या डिझायनर्स ची बैठक घेऊन भारताला जागतिक पातळीवर फॅशनची राजधानी म्हणून स्थापित करण्यासाठी आणि आपल्या संस्कृतीचे तसेच हस्तकलेच्या वारशाची खऱ्या अर्थाने धुरा वाहणारे आपल्या देशातील कारागीर आणि विणकर यांना सक्षम करण्यासाठी विविध संकल्पनांवर चर्चा केली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे सचिव यू.पी.सिंग आणि एनआयएफटी अर्थात राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेचे महासंचालक शांतमनु हे देखील या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सुनिता शंकर, सव्यसाची मुखर्जी यांच्यासह फॅशन विश्वात प्रसिध्द असलेले आणि भारतातील हातमाग तसेच हस्तकला क्षेत्राचा मोठा अनुभव असलेले एनआयएफटीचे 27 माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या मंचावर भारतीय कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या काही अति वरिष्ठ डिझायनर प्रभृती एकत्र आलेल्या दिसल्या.
डिझायनर व्यक्तींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कारागिरांचे सहकारी संबंध आणि तंत्रज्ञान तसेच विपणन क्षेत्रातील हस्तक्षेप कशा प्रकारे कलेची कक्षा वाढवू शकतील यावर चर्चा घडवून आणणे हे या बैठकीच्या आयोजनाचे उद्दिष्ट होते.
हातमाग आणि हस्तकला क्षेत्रात कार्यरत 75 लाख कलाकारांचे उत्पन्न एक हजार रुपये प्रती महिना वाढेल याची सुनिश्चिती करण्यासाठी सुसंवादी पद्धतीने काम करण्याचा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी यावेळी उपस्थित डिझायनर्सना सल्ला दिला. ते म्हणाले की, भारताची कला आणि वारसा यांना ओळख प्राप्त करून देऊन त्यांचे जतन करणे हे आपले यापुढील उद्दिष्ट आहे.

एनआयएफटी संस्थेच्या 30,000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हस्तकला परिसंस्थेत बदल घडवून आणावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
एनआयएफटी संस्थेच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याने एका कलाकाराला दत्तक घ्यावे आणि समाजाच्या वंचित वर्गाला संरेखन,व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत शिक्षित करण्यासाठी वेळ द्यावा अशी सूचना केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली.
या बैठकीमध्ये एनआयएफटी संस्थेच्या शिक्षण विभागाच्या डीन प्रा.डॉ.वंदना नारंग आणि उद्योग विभाग तसेच माजी विद्यार्थी व्यवहार विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.जोनाली डी. बाजपेयी हे देखील उपस्थित होते.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1797613)
आगंतुक पटल : 246