अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अन्नप्रक्रिया क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक

Posted On: 11 FEB 2022 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2022

परकीय थेट गुंतवणूक धोरण आणि डेटा यांची हाताळणी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे  (DPIIT)  केली जाते.  एप्रिल 2000 पासून नोव्हेंबर 2021 पर्यंत अन्न प्रक्रिया क्षेत्रात एकूण 10 अब्ज 88 कोटी डॉलरची (10.88अब्ज US$) परकीय गुंतवणूक करण्यात आली.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्रात थेट गुंतवणूक करणाऱ्या काही प्रमुख कंपन्यांमध्ये पुढील कंपन्यांचा  समावेश आहेबीएसए इंटरनॅशनल (B.S.A.INTERNATIOAL), बेल्जियम; कॅडबरी श्वेप्प्स मॉरिशस लिमिटेड,(CADBURRY SCHEWEPPES) मॉरिशसयुनिलिव्हर पीएलसी, युनायटेड किंगडम(UNILEVER PLC); ओरक्ला आशिया पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेड( Orkla Asia Pacific Pte Ltd) सिंगापूरडॅनोन एशिया पॅसिफिक होल्डिंग्स लिमिटेड, सिंगापूर(DANNONE ASIA PACIFIC HOLDINGS); रोक्वेट फ्रेरेस  (ROQUETTE FRERES), फ्रान्सरीले बी.व्ही.नेदरलँड(RELAY B.V.,); पेप्सिको पॅनिमेक्स आयएनसी (PEPSICO PANIMEX INC), मॉरिशस इ.

कर्जाशी संबंधित डेटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून  जारी केला जातो.  त्यानुसार, 1990 पासून मार्च 2021 पर्यंत उद्योगांना दिलेल्या एकूण कर्जामध्ये अन्न प्रक्रिया क्षेत्राचा वाटा 5.37% (अंदाजे) इतका होता.

ही माहिती अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री श्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 

 

 

 

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797606) Visitor Counter : 193