राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनाच्या वार्षिक "उद्यानोत्सव" चे उद्‌घाटन


मुघल गार्डन 12 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत सामान्य लोकांसाठी खुले राहणार

केवळ आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारेच प्रवेश मिळणार

Posted On: 10 FEB 2022 7:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (10 फेब्रुवारी, 2022) राष्ट्रपती भवनाच्या वार्षिक "उद्यानोत्सव" चे उद्‌घाटन केले.

मुघल गार्डन 12 फेब्रुवारी 2022 ते 16 मार्च 2022 (देखभालीचे दिवस असलेले सोमवार वगळता ) सकाळी दहा  ते संध्याकाळी  पाच  (शेवटचा  प्रवेश संध्याकाळी चार वाजता) या कालावधीत  सामान्य लोकांसाठी खुले राहील.

आगाऊ ऑनलाइन नोंदणीद्वारेच पर्यटकांना गार्डन पाहण्याची परवानगी दिली जाईल. यासाठी https://rashtrapatisachivalaya.gov.in किंवा https://rb.nic.in/rbvisit/visit_plan.aspx या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही खबरदारीचा उपाय म्हणून नोंदणीशिवाय म्हणजेच वॉक-इन एंट्री उपलब्ध होणार नाही.

सात पूर्व नोंदणी  केलेले तासाप्रमाणे स्लॉट सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दरम्यान उपलब्ध असतील.अंतिम प्रवेश संध्याकाळी चार वाजता  देण्यात येईल. प्रत्येक स्लॉटमध्ये जास्तीत जास्त 100 व्यक्तींचा समावेश असेल. या भेटी दरम्यान, अभ्यागतांनी  मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादी कोविड प्रतिबंधक पालन करावे लागेल. त्यांना प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग करावे लागेल. अभ्यागतांना  मास्कशिवाय  परवानगी दिली जाणार नाही.

जेथे नॉर्थ अ‍ॅव्हेन्यू राष्ट्रपती भवनाला मिळतो  त्या जवळ असलेल्या  राष्ट्रपती इस्टेटच्या गेट क्रमांक 35 मधून  प्रवेश आणि निर्गमन असेल.

भेटी दरम्यान अभ्यागत मोबाईल फोन घेऊन जाऊ शकतात.मात्र , त्यांनी कोणत्याही पाण्याच्या बाटल्या, ब्रीफकेस, हँडबॅग/लेडीज पर्स, कॅमेरा, रेडिओ/ट्रान्झिस्टर, बॉक्स, छत्र्या, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा आणि खाण्याचे साहित्य इत्यादी आणू नयेत अशी विनंती करण्यात आली आहे. सार्वजनिक मार्गावर विविध ठिकाणी हँड सॅनिटायझर, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार/वैद्यकीय सुविधा यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

फेब्रुवारीमध्ये टप्प्याटप्प्याने फुलणाऱ्या 11 प्रकारच्या जातीचे ट्युलिप्स हे  यंदाच्या उद्यानोत्सवाचे मुख्य आकर्षण  असणार आहे. सेंट्रल लॉनमध्ये भव्य रचना असलेले  फुलांचे गालिचे देखील असतील. यावर्षी शोभेच्या फुलांची प्रमुख रंगसंगती पांढरी, पिवळी, लाल आणि केशरी आहे. बागांमध्ये  हवा शुद्ध करणार्‍या काही वनस्पतींसह एक छोटा कॅक्टस (निवडुंग) कॉर्नर देखील असणार आहे.

 

 

S.Thakur/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797379) Visitor Counter : 204