पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'स्वदेश दर्शन' योजनेच्या पर्यावरणपूरक संकल्पनेअंतर्गत देशातील 6 प्रकल्पांना पर्यटन मंत्रालयाची मंजुरी : जी. किशन रेड्डी

Posted On: 10 FEB 2022 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022

पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यावरणपूरक  पर्यटनाला चालना देण्यासाठी स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या  पंधरा संकल्पना आधारित  सर्किट्सपैकी एक म्हणून पर्यावरणपूरक सर्किट निश्चित केले आहे. पर्यटन मंत्रालयाने ‘स्वदेश दर्शन’ योजनेमधील पर्यावरणपूरक  संकल्पने अंतर्गत 6 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.

मंत्रालयाने 27 सप्टेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (युएनईपी ) आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम सोसायटी ऑफ इंडिया (आरटीएसओई  ) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. परस्परांच्या  पर्यटन क्षेत्रातील ‘शाश्वतता उपक्रमांना’ सक्रियपणे प्रोत्साहन  आणि पाठबळ  देण्यासाठी उपाययोजना हाती घेणे  आणि जिथे शक्य असेल तिथे सहयोगी पद्धतीने कार्य करणे हा या कराराचा उद्देश आहे.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने वन आणि वन्यजीव क्षेत्रात शाश्वत पर्यावरण पर्यटन -2021 संदर्भात मार्गदर्शक तत्वे जारी केल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. पर्यावरणपूरक पर्यटन स्थळांचे वहन क्षमता विश्लेषण-आधारित वर्णन समाविष्ट असलेली पर्यटन योजना तयार करण्याची तरतूद या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये संबंधित राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे पर्यावरणपूरक  पर्यटन स्थळांची नियमित देखभाल  करण्याची तरतूदही आहे.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1797287) Visitor Counter : 250