आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 171 कोटी 28 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासांत, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 46 लाख 44 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 96.95%

गेल्या 24 तासांत देशात 67,084 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 7,90,789

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.58% आहे

Posted On: 10 FEB 2022 9:21AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 10 फेब्रुवारी 2022
 

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 46 लाख 44 हजारांहून अधिक  (46,44,382) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 171 कोटी 28 लाखांचा (1,71,28,19,947)   टप्पा ओलांडला आहे.
देशभरात 1,91,17,879 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,98,679

2nd Dose

99,16,566

Precaution Dose

37,74,605

FLWs

1st Dose

1,84,03,692

2nd Dose

1,73,47,897

Precaution Dose

50,68,860

Age Group 15-18 years

1st Dose

5,08,96,400

2nd Dose

1,05,23,483

Age Group 18-44 years

1st Dose

54,65,63,415

2nd Dose

42,13,47,177

Age Group 45-59 years

1st Dose

20,13,26,926

2nd Dose

17,51,89,201

Over 60 years

1st Dose

12,56,52,278

2nd Dose

10,91,38,465

Precaution Dose

72,72,303

Precaution Dose

1,61,15,768

Total

1,71,28,19,947

 

गेल्या 24 तासांत 1,67,882  रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची  सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,11,80,751 झाली आहे.

 
परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 96.95% झाला आहे.


 

 

गेल्या 24 तासांत, देशात 67,084 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.
 

 
भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 7,90,789 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 1.86% आहे.


 

 
कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 15,11,321 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 74 कोटी 61 लाखांहून अधिक (74,61,96,071) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
 
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 6.58% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 4.44%.इतका आहे.


 

 
****


 JPS/SP

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1797147) Visitor Counter : 165