नागरी उड्डाण मंत्रालय

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माल आणि दळणवळण सहाय्यक कंपनीने (एएआयसीएलएएस) 2014 नंतर देशांतर्गत 27 अतिरिक्त हवाई मालवाहू (कार्गो) टर्मिनल बांधले

Posted On: 07 FEB 2022 6:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2022

भारतात 2014 पर्यंत, देशांतर्गत 11 हवाई कार्गो टर्मिनल आणि 19 आंतरराष्ट्रीय हवाई कार्गो टर्मिनल होते. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) / एएआय माल दळणवळण आणि सहाय्यक सेवा कंपनी मर्यादितने  (एएआयसीएलएएस) देशांतर्गत आणखी  27 अतिरिक्त हवाई मालवाहू (कार्गो) टर्मिनल तयार केले. याशिवाय, संयुक्त उपक्रम (जे व्ही)/ सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) आणि राज्य सरकारांची विमानतळेही  देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय हवाई कार्गो टर्मिनल्सच्या उभारणी प्रक्रियेत आहेत.  अशा प्रकारे, मालाचे जलद दळणवळण सुलभ करण्यासाठी माल (कार्गो) हाताळणीची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवण्यात आली आहे.

एएआयसीएलएएस मालवाहतुकीच्या व्यवहार्यतेवर अवलंबून दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाच्या शहरांसह, देशांतर्गत मालवाहू (कार्गो) टर्मिनलची उभारणी करुन माल (कार्गो) हाताळणी सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे.  परिणामी, एएआयसीएलएएसने 2014 नंतर अमृतसर, मदुराई, मंगलोर, विशाखापट्टणम, चेन्नई, इंदूर, कोलकाता, अहमदाबाद, रायपूर, औरंगाबाद, भुवनेश्वर, वाराणसी, गोवा, श्रीनगर, रांची, त्रिवेंद्रमगुवाहाटी, विजयवाडा, बागडोगरा, जम्मू, लेह, सुरत, भोपाळ, डेहराडून, राजमुंद्री, तिरुपती आणि हुबली येथे अतिरिक्त 27 देशांतर्गत हवाई कार्गो टर्मिनल तयार केले आहेत.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (जनरल डॉ) व्ही.के. सिंग (निवृत्त) यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

 

 

 

S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1796237) Visitor Counter : 188