कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 भारताला जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका निभावण्यास तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाकडून शतकमहोत्सवापर्यंत प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी वाव देतो - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
05 FEB 2022 9:48PM by PIB Mumbai
केंद्रीय अर्थसंकल्प 2022, भारताला जागतिक स्तरावर महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी तसेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापासून ते शतकमहोत्सवी वर्षांपर्यंत प्रगतीपथावर वाटचाल करण्यासाठी वाव देत असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्प 2022-23 वर भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेल्या विशेष परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात नामवंत अर्थतज्ञ, विचारवंत, उद्योग-व्यापार क्षेत्रातील नामवंत व्यक्ति यांच्यासह अनेक संबंधित उपस्थित होते.
आज संपूर्ण जग भारताचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे, मात्र प्रश्न हा आहे की आपण जगाचे नेतृत्व करण्यास सिद्ध झालो आहोत का? अशी विचारणा करतानाच अर्थसंकल्प 2022 या प्रश्नाचे उत्तर आपल्याला देतो असे ते म्हणाले. तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावर आधारित अर्थव्यवस्थेच्या आधारावर भारत एक मोठी झेप घेण्यास सज्ज असल्याचेच या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित होते. तसेच, भारताच्या आतापर्यंत वापरल्या न गेलेल्या क्षमता, ज्यात सखोल सागरी संसाधनांचाही समावेश आहे, त्यांचा वापर करत स्वतःला समृद्ध करण्याची संधी या अर्थसंकल्पातून आपल्याला मिळणार आहे.

भविष्यातील अर्थव्यवस्था ही कल्पनांची अर्थव्यवस्था असणार आहे, अभिनवतेच्या, कल्पनाशक्तीच्या नवोन्मेषाची असणार आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या भविष्यवेधी दूरदृष्टीचे, प्रतिबिंब मांडणारा आहे. मग ती स्टार्ट अप्स साठीची ड्रोनशक्ती असो किंवा किसान ड्रोन, आभासी व्यवहारांवर 30 टक्के कर, कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे धोरण इत्यादीचा त्यांनी उल्लेख केला.
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, अर्थसंकल्पात रसायन - विरहित शेती, शाश्वत स्टार्ट - अप्स, ड्रोन तंत्रज्ञान आणि विविध तंत्रज्ञान आधारित विकासावर भर देण्यात आला आहे. ते म्हणाले अर्थसंकल्पात शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी आणि ‘किसान ड्रोन’ ‘ड्रोन शक्ती’ आणि ‘सेवा म्हणून ड्रोन’ (DrAAS) या स्वरूपातील स्टार्ट - अप्स साठी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे विविध क्षेत्रांत मुबलक रोजगार निर्मिती होणार आहे. ते म्हणाले शाश्वत स्टार्ट - अप्स केंद्रीय अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी होते, कारण त्यात सरकारी नोकऱ्यांच्या उत्तम संधी आहेत. ते असेही म्हणाले की मुबलक नोकरीच्या संधी देणाऱ्या संकल्पना, नवोन्मेष आणि भविष्यातील विचारांवर आधारित अर्थव्यवस्था उभी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795837)
अभ्यागत कक्ष : 264