युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम योजनेकरिता 2,710.65 कोटी रुपयांची तरतूद

Posted On: 04 FEB 2022 9:05PM by PIB Mumbai

 

तरुणांचे व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने आणि त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने, सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार (2021-22 to 2025-26) राष्ट्रीय युवा शक्तीकरण कार्यक्रम ही योजना 2,710.65 कोटी रुपयांच्या खर्चासह सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम (RYSK) योजना सुरू ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मंत्री म्हणाले, "मंत्रालय आणि सर्व हितधारकांच्या वतीने, मी राष्ट्रीय युवा शक्तीकरण कार्यक्रम योजनेचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांसाठी वाढवल्याबद्दल आणि राष्ट्रीय महत्व दिल्याबद्दल पंतप्रधानांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो."

राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम योजना ही युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची महत्वाकांक्षी केंद्रीय क्षेत्र योजना आहे. योजनेचे लाभार्थी हे राष्ट्रीय युवा धोरण, 2014 मधील 'युवा' च्या व्याख्येनुसार 15-29 वयोगटातील तरुण आहेत. कार्यक्रमाच्या घटकांच्या बाबतीत, विशेषत: किशोरवयीन मुलांसाठी, लाभार्थी वयोगट 10-19 वर्षे आहे. राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम योजनेचे कार्यक्रम सात उप-योजनांमधून राबविण्यात येतात:-

(i) नेहरू युवा केंद्र संघटन (NYKS)

(ii) राष्ट्रीय युवा कॉर्प्स (NYC)

(iii) युवा आणि किशोरवयीन विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (NPYAD)

(iv) आंतरराष्ट्रीय सहकार्य

(v) युवा वसतिगृहे (YH)

(vi) स्काऊटिंग अँन्ड गाईडींग संस्थांना सहाय्य

(vii) राष्ट्रीय युवा नेतृत्व कार्यक्रम (NYLP).

राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रमाच्या नेहरू युवा केंद्र संघटन या उप-योजनेअंतर्गत, सध्या सुमारे 50.34 लाख युवा स्वयंसेवक 2.57 लाख युवा क्लबद्वारे नोंदणीकृत आहेत आणि यात देशभरातील 623 जिल्ह्यांचा समावेश आहे.

***

N.Chitale/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1795648) Visitor Counter : 201