अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
सूक्ष्म उद्योगांसाठी 'आत्मनिर्भर भारत पॅकेज'
Posted On:
04 FEB 2022 4:13PM by PIB Mumbai
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय 'आत्मनिर्भर भारत' या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 2 लाख सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या स्थापनेसाठी/ त्यांना श्रेणीसुधारणा करण्यासाठी, आर्थिक, तांत्रिक तसेच व्यावसायिक सहाय्य प्रदान करण्यासाठी केंद्रीय स्तरावर 'मायक्रो फूड प्रोसेसिंग एंटरप्रायझेस (PMFME) योजना' राबवत असून, त्यायोगे 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षांमध्ये 10,000 कोटी रुपयांचे क्रेडिट लिंक्ड अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेत पतसंस्थेमधून वाढीव कर्जासाठी संमती, ब्रँडिंग आणि विपणन बळकट करून संघटित पुरवठा साखळीत एकीकरण, सामान्य सेवांमध्ये वाढ, संस्थांचे सबलीकरण, अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षण याद्वारे सूक्ष्म उद्योगांना समर्थन देणे या बाबी समाविष्ट आहेत.
अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
***
S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795447)
Visitor Counter : 275