श्रम आणि रोजगार मंत्रालय
रोजगार देण्यासाठी शहरी मनरेगा कार्यक्रम
Posted On:
03 FEB 2022 6:15PM by PIB Mumbai
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्याद्वारे वर्ष 2017-18 पासून ठराविक अंतराने घेण्यात येणाऱ्या श्रम दल सर्वेक्षणाच्या माध्यमातून रोजगार/बेरोजगारविषयक आकडेवारी संकलित केली जाते. 2019-20 च्या ताज्या श्रम दल सर्वेक्षण अहवालानुसार, शहरी भागात सामान्य स्थितीच्या आधारे 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर 6.9% होता जो 2018-19 मध्ये 7.6% आणि 2017-18 मध्ये 7.7% होता.
सरकारने एप्रिल, 2021 मध्ये अखिल भारतीय आस्थापना आधारित त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (AQEES) सुरू केले आहे. त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (QES) च्या दुसऱ्या फेरीनुसार, जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत अर्थव्यवस्थेच्या नऊ निवडक क्षेत्रात रोजगार वाढून 3.10 कोटी पर्यंत झाला. त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत (एप्रिल-जून, 2021) हे प्रमाण 3.08 कोटी होते. सहाव्या आर्थिक जनगणनेत (2013-14) नोंदवल्यानुसार या क्षेत्रांमधील एकत्रित प्रमाण 2.37 कोटी होते. निवडक नऊ क्षेत्रांमध्ये अंदाजित एकूण रोजगारांपैकी उत्पादन क्षेत्राचा वाटा जवळपास 39%, त्यापाठोपाठ शिक्षण क्षेत्राचा वाटा 22% आणि आरोग्य तसेच माहिती तंत्रज्ञान /बीपीओ या क्षेत्रांचा वाटा सुमारे 10% राहील. कामगारांच्या अंदाजित एकूण संख्येपैकी सुमारे 5.3% व्यापार आणि 4.6% वाहतूक क्षेत्रात आहेत.
केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1795166)
Visitor Counter : 176