अंतराळ विभाग

चांद्रयान-3 चे प्रक्षेपण ऑगस्ट 2022 मध्ये नियोजित - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 03 FEB 2022 5:18PM by PIB Mumbai

 

केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, चांद्रयान-3 चे प्रक्षेपण ऑगस्ट 2022 मध्ये नियोजित आहे.

चांद्रयान-2 मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि राष्ट्रीय स्तरावरील तज्ञांनी केलेल्या सूचनांवर आधारित, चांद्रयान-3 ची अंमलबजावणी प्रगतीपथावर आहे. याच्याशी संबंधित अनेक हार्डवेअर आणि त्याच्या विशेष चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत आणि ऑगस्ट 2022 मध्ये चांद्रयान-3 प्रक्षेपित करण्याचे नियोजित करण्यात आले आहे, काल लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ. जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली.

2022 (जानेवारी ते डिसेंबर 22) दरम्यान, 08 लाँच व्हेइकल मिशन्स, 07 स्पेसक्राफ्ट मिशन्स आणि 04 टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर मिशन्स यांसारख्या नियोजित मोहिमांची संख्या 19 आहे, अशीही माहिती मंत्र्यांनी दिली.

कोविड-19 महामारीचा परिणाम सुरु असलेल्या अनेक मोहिमांवर झाला. तसेच, अंतराळ क्षेत्रातील सुधारणा आणि नव्याने सादर केलेल्या मागणीवर आधारित नमुन्यांच्या पार्श्वभूमीवर, प्रकल्पांचा प्राधान्यक्रम पुन्हा निश्चित करण्यात आला आहे. मागील 3 वर्षात खालील मोहिमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांची यादी

 

Satellite Name

Launch Date

 

EOS-03

Aug 12, 2021

Amazonia-1

Feb 28, 2021

Satish Dhawan SAT (SDSAT)

Feb 28, 2021

UNITYsat

Feb 28, 2021

CMS-01

Dec 17, 2020

EOS-01

Nov 07, 2020

GSAT-30

Jan 17, 2020

RISAT-2BR1

Dec 11, 2019

Cartosat-3

Nov 27, 2019

Chandrayaan-2

Jul 22, 2019

RISAT-2B

May 22, 2019

EMISAT

Apr 01, 2019

GSAT-31

Feb 06, 2019

Microsat-R

Jan 24, 2019

Kalamsat-V2

Jan 24, 2019

***

S.Tupe/S.Chavan/P.Kor



(Release ID: 1795123) Visitor Counter : 265