गृह मंत्रालय
देशातल्या बंदी घालण्यात आलेल्या संघटना
Posted On:
02 FEB 2022 5:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 फेब्रुवारी 2022
देशात बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा, 1967 (युएपीए ) च्या पहिल्या परिशिष्टात सूचीबद्ध असलेल्या दहशतवादी संघटनांची संख्या 42 आहे आणि युएपीए अंतर्गत बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या संघटनांची संख्या 13 आहे. आतापर्यंत 31 व्यक्तींचा कायद्याच्या परिशिष्ट चार अंतर्गत दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था अशा सर्व संघटना /व्यक्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतात आणि कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करतात.
बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) सुधारणा कायदा, 2019 ने व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित करण्याची तरतूद समाविष्ट केली आहे, त्यामुळे बंदी घातलेल्या संघटनांचे नेते/सदस्य इतर नावांनी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी झाली आहे.
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1794767)