केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) लिमिटेड विभागीय स्पर्धा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल
Posted On:
31 JAN 2022 1:37PM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 14.03.2021 रोजी घेतलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सहाय्यक कमांडंट (कार्यकारी) लिमिटेड विभागीय स्पर्धा परीक्षा, 2021 च्या लेखी परीक्षेच्या आणि 17.01.2022 ते 20.01.2022 या कालावधीत व्यक्तिमत्व चाचणीसाठी झालेल्या मुलाखतींच्या निकालावर आधारित , केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात असिस्टंट कमांडंट (कार्यकारी) या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता क्रमाने यादी खाली देण्यात आली आहे.
वेगवेगळ्या श्रेणींअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे:
General
|
SC
|
ST
|
Total
|
18
|
03
|
02
|
23
|
परीक्षेच्या सध्याच्या नियमांनुसार आणि उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार काटेकोरपणे नियुक्त्या केल्या जातील. सरकारने नोंद केलेल्या रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे.
General
|
SC
|
ST
|
Total
|
18
|
03
|
02
|
23
|
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलामध्ये परीक्षा सभागृहाजवळ एक "सुविधा काउंटर" आहे. कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वैयक्तिकरित्या किंवा 011-23385271/23381125 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून उमेदवार त्यांच्या परीक्षा/भर्ती बाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण मिळवू शकतात. आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही निकाल उपलब्ध असेल.तथापि, उमेदवारांचे गुण हे निकाल जाहीर झाल्यापासून पंधरा दिवसांच्या आत आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
***
Jaydevi PS/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793799)
Visitor Counter : 200