पंतप्रधान कार्यालय

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण

Posted On: 30 JAN 2022 9:59AM by PIB Mumbai

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. आज,हुतात्मा दिनानिमित्त, पंतप्रधानांनी आपल्या देशाचे धैर्याने रक्षण करणाऱ्या सर्व शूरवीरांनाही आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"बापूंच्या पुण्यतिथीला त्यांचे स्मरण.त्यांचे महान आदर्श जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सामूहिक प्रयत्न आहे.

आज, हुतात्मा दिनानिमित्त, आपल्या देशाचे धैर्याने रक्षण करणाऱ्या सर्व शूरवीरांना आदरांजली. त्यांची सेवा आणि शौर्य सदैव स्मरणात राहील."

 

***

JaydeviPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793627) Visitor Counter : 192