आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारतात समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 165.04 कोटीहून अधिक
गेल्या 24 तासात 56 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या
भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 93.89%
देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2,35,532 नवे रुग्ण
देशातली उपचाराधीन रुग्णसंख्या 20,04,333
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 16.89%
Posted On:
29 JAN 2022 9:42AM by PIB Mumbai
भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 56 लाखाहून अधिक (56,72,766) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 165.04 कोटीहून अधिक (165,04,87,260) मात्रा दिल्या आहेत. एकूण 180,50,126 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,94,504
|
2nd Dose
|
98,51,506
|
Precaution Dose
|
31,80,245
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,94,187
|
2nd Dose
|
1,72,01,841
|
Precaution Dose
|
34,95,155
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
4,50,05,663
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
53,87,78,260
|
2nd Dose
|
39,97,30,894
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
19,98,71,411
|
2nd Dose
|
16,97,87,806
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,45,81,342
|
2nd Dose
|
10,58,53,403
|
Precaution Dose
|
43,61,043
|
Precaution Dose
|
1,10,36,443
|
Total
|
1,65,04,87,260
|
गेल्या 24 तासात 3,35,939 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,83,60,710 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 93.89% झाला आहे.
गेल्या 24 तासात 2,35,532 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 20,04,333 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 4.91% इतके आहेत.
देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 17,59,434 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 72.37 कोटीहून अधिक (72,57,74,705) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 16.89% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 13.39% आहे.
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793477)
Visitor Counter : 200