अवजड उद्योग मंत्रालय
भारतीय भांडवली वस्तू क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढविण्याबाबतच्या योजनेचा दुसरा टप्पा सरकारने केला अधिसूचित
975 कोटींचे अर्थसंकल्पीय सहाय्य आणि 232 कोटी रुपयांच्या उद्योग क्षेत्राच्या योगदानासह 1207 कोटी रुपये खर्चाची योजना
सामान्य तंत्रज्ञान विकास आणि सेवा पायाभूत सुविधांसाठी सहाय्य प्रदान करण्याचे उद्दिष्ट
Posted On:
28 JAN 2022 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022
सामान्य तंत्रज्ञान विकास आणि सेवा पायाभूत सुविधांसाठी सहाय्य प्रदान करण्याच्या अनुषंगाने, अवजड उद्योग मंत्रालयाने भारतीय भांडवली वस्तू क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढविण्याबाबतच्या योजनेचा दुसरा टप्पा अधिसूचित केला आहे. 975 कोटींचे अर्थसंकल्पीय सहाय्य आणि 232 कोटी रुपयांच्या उद्योग क्षेत्राच्या योगदानासह 1207 कोटी रुपये खर्चाची ही योजना आहे. योजनेचा दुसरा टप्पा 25 जानेवारी 2022 रोजी अधिसूचित करण्यात आला.
उत्पादन क्षेत्रात किमान 25% योगदान असलेल्या बळकट आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक भांडवली क्षेत्राच्या निर्मितीद्वारे, अधिक प्रोत्साहन प्रदान करणाऱ्या पहिल्या टप्प्यातील पथदर्शी योजनेमुळे प्राप्त झालेल्या परिणामांचा विकास आणि विस्तार करण्याच्या दृष्टीने, भांडवली वस्तू क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढवण्याचे योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्ट आहे.
भांडवली वस्तू क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सहा घटकांचा समावेश आहे ते खालीलप्रमाणे:
- तंत्रज्ञान नवोन्मेष पोर्टलद्वारे तंत्रज्ञानाची निवड;
- चार नवीन अत्याधुनिक उत्कृष्टता केंद्रांची स्थापना आणि विद्यमान उत्कृष्टता केंद्रांचा विकास करणे;
- भांडवली वस्तू क्षेत्रातील कौशल्याला प्रोत्साहन –कौशल्य पातळी 6 आणि त्यावरील पातळीसाठी पात्रता पॅकेजेसची निर्मिती
- चार सामायिक अभियांत्रिकी सुविधा केंद्रांची (सीईएफसी) स्थापना आणि विद्यमान सीईएफसींचा विकास;
- विद्यमान चाचणी आणि प्रमाणन केंद्रांचा विकास ;
- तंत्रज्ञान विकासासाठी दहा उद्योग प्रवेगकांची स्थापना
अर्ज नमुन्यासह योजनेची तपशीलवार मार्गदर्शक तत्त्व येथे उपलब्ध आहेत:
https://heavyindustries.gov.in/writereaddata/UploadFile/Notification%20for%20Capital%20Goods%20%20Phase%20II%20.pdf
S.Tupe/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1793263)