नौवहन मंत्रालय

जेएनपीटीने 2021 मध्ये 5.63 दशलक्ष टीईयू इतकी विक्रमी मालवाहतूक हाताळली

Posted On: 28 JAN 2022 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 जानेवारी 2022

भारतातील प्रमुख कंटेनर बंदर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) मालवाहतुकीतीचा चढता आलेख कायम ठेवत 2020 मधील 4.47 दशलक्ष टीईयूच्या तुलनेत 2021 मध्ये 5.63 दशलक्ष टीईयू (5,631,949 टीईयू) कंटेनर वाहतूक हाताळली असून ही वाढ 25.86% आहे. एकूण 76.14 दशलक्ष टन वाहतूक आणि 5.63 दशलक्ष टीईयू कंटेनर वाहतूक ही बंदराची स्थापना  झाल्यापासून एका वर्षात हाताळलेली सर्वाधिक वाहतूक आहे. भारतातील कोणत्याही बंदराने हाताळलेली कंटेनरची ही सर्वोच्च वाहतूक आहे. 2021 मध्ये न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (NSICT)N ने 1.17 दशलक्ष टीईयू (1,166,019) आणि भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (BMCT) ने 1.17 दशलक्ष टीईयू  (1,170,502) कंटेनर वाहतूक हाताळली असून प्रथमच वार्षिक दहा लाख टीईयूचा टप्पा ओलांडला आहे.  2021-22 या आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत जेएनपीटी मधून 4,177,211 टीईयू  कंटेनर वाहतूक झाली, जी मागील वर्षातील याच कालावधीतील 3,222,093 टीईयू कंटेनर वाहतुकीच्या तुलनेत 29.64% अधिक आहे.

बंदराच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कर्मचारी आणि संबंधितांचे अभिनंदन करताना, जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, महामारीच्या आव्हानांना सामोरे जाताना बंदराची गेल्या वर्षभरातील ही कामगिरी भारतातील आर्थिक विकासाला चालना देण्याप्रति आमची  वचनबद्धता दर्शवते. संपूर्ण जग महामारीतून सावरत असताना आणि वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, हे बंदर संपूर्ण परिचालनासह सज्ज असून संबंधितांना  मालाची वेळेवर आणि सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करून त्यांचा लॉजिस्टिक खर्च कमी करण्यात मदत करत आहे.

या वर्षी, जेएनपीटीने किनारी मालवाहतुकीला चालना देण्यासाठी सागरमाला कार्यक्रमांतर्गत किनारी नौवहनासाठी समर्पित नवीन धक्क्यावर प्रायोगिक कामकाज सुरू केले. जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा येथे, वापरकर्त्यांसाठी JNP-CPP मोबाइल अॅप आणि eWallet चा प्रारंभ  करण्यात आला. यामुळे त्यांना सीपीपी परिचलनाची प्रत्यक्ष आकडेवारी आणि फॅक्टरी सीलबंद निर्यात कंटेनरसाठी तपासणी सुविधा उभारण्याकरिता पायाभरणी करण्यात आली. एक्झिम कार्गोची रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, जेएनपीटीने  डबल-स्टॅक्ड ड्वार्फ कंटेनर्सद्वारे ड्वार्फ कंटेनर रेल्वे सेवा सुरू करून जेएनपीटीमध्ये रेल्वे-कार्गो वाहतूक वाढवत  एक्झिम समुदायाला लॉजिस्टिक खर्च कमी करण्यास मदत केली.

 

 

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1793232) Visitor Counter : 212