आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 163 कोटी 58 लाखांपेक्षा अधिक मात्रा देण्यात आल्या


गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 59 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 93.23 टक्के

गेल्या 24 तासात देशात 2,85,914 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रिय रुग्णसंख्या 22,23,018

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 7.33टक्के

Posted On: 26 JAN 2022 9:28AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या जवळपास 59 लाखांहून अधिक (59,50,731) मात्रा देण्यात आल्या. त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 163 कोटी 58 लाखांचा (1,63,58,44,536) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,78,01,420 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले. आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे-

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

1,03,93,701

2nd Dose

98,33,992

Precaution Dose

29,47,370

FLWs

1st Dose

1,83,92,355

2nd Dose

1,71,66,809

Precaution Dose

30,29,190

Age Group 15-18 years

1st Dose

4,35,09,633

Age Group 18-44 years

1st Dose

53,66,36,102

2nd Dose

39,37,50,214

Age Group 45-59 years

1st Dose

19,95,01,746

2nd Dose

16,80,61,976

Over 60 years

1st Dose

12,43,40,238

2nd Dose

10,48,29,504

Precaution Dose

34,51,706

Precaution Dose

94,28,266

Total

 

गेल्या 24 तासात 2,99,073 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात (महामारीची सुरुवात झाल्यापासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 3,73,70,971. झाली आहे.

गेल्या 24 तासांत, देशात 2,85,914 नव्या कोविड बाधितांची नोंद झाली.

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 22,23,018 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 5.55 टक्के इतके आहे.

कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरू आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 17,69,745 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 72 कोटी 5 लाखांहून अधिक (72,05,72,178) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 17.33% आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 16.16%.टक्के इतका आहे.

***

Jaydevi PS/ SK

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1792750) Visitor Counter : 242