गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जीवन रक्षा पदक मालिका पुरस्कार-2021 प्रदान करण्यास राष्ट्रपतींची मान्यता

Posted On: 25 JAN 2022 5:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2022

51 व्यक्तीना  जीवन रक्षा पदक शृंखला  पुरस्कार - 2021 प्रदान करण्यासाठी राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे.  यात  06 जणांना सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, 16 जणांना उत्तम जीवन रक्षा पदक आणि 29 जणांना जीवन रक्षा पदक यांचा समावेश आहे.

एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी मानवी स्वभावानुसार केलेल्या प्रशंसनीय कार्यासाठी जीवन रक्षा पदक शृंखला  पुरस्कार प्रदान केले  जातात.  हा पुरस्कार सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक अशा तीन श्रेणींमध्ये दिला जातो. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. हा पुरस्कार मरणोत्तरही प्रदान केला  जाऊ शकतो.

(पदक, केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र आणि एकरकमी आर्थिक भत्ता) असे या पुरस्काराचे स्वरूप  असून पुरस्कार प्राप्त व्यक्तीला संबंधित केंद्रीय मंत्रालये/संस्था/राज्य सरकार यांच्याकडून पुरस्कार प्रदान केला जातो.

पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

 

 

M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 


(Release ID: 1792548) Visitor Counter : 335