सांस्कृतिक मंत्रालय
आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून संस्कृती मंत्रालयाच्या वतीने, उद्या राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त 'उमंग' या रांगोळी उत्सवाचे आयोजन
सहभागी संघ देशभरातील 50 हून अधिक ठिकाणी रांगोळी काढणार
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2022 2:53PM by PIB Mumbai
‘आझादी का अमृत महोत्सव’ हा भारत सरकारचा एक उपक्रम असून भारताच्या 75 वर्षांच्या प्रगतीशीलतेचा आणि लोकांच्या संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास साजरा करण्यासाठी आणि स्मरण करण्यासाठी आयोजित केलेला एक उपक्रम आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून, संस्कृती मंत्रालय दिनांक 24 जानेवारी 2022 रोजी 'उमंग रांगोळी उत्सव' आयोजित करत आहे. 24 जानेवारी हा दिवस दरवर्षी 'राष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो आणि या वर्षी 'राष्ट्रीय बालिका उत्सव' दिवस साजरा करण्यासाठी, आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत हा देशव्यापी उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात, सहभागी संघ महिला स्वातंत्र्यसैनिकांचे किंवा देशातील आदर्श महिलेचे नाव दिलेल्या रअसते मार्गावर आणि चौकांवर सुमारे एक किलोमीटर लांबीची रांगोळी काढून सजावट करतील. देशभरात 50 हून अधिक ठिकाणी अशाप्रकारची रांगोळी काढली जाणार आहे. ‘बालिका दिन’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ अशाप्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याची ही एक उत्तम पर्वणी आहे.
***
S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1791971)
आगंतुक पटल : 414