पंतप्रधान कार्यालय

मणिपूरच्या 50 व्या राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी केले संबोधित


"इतिहासातील चढ-उतारांना सामोरे जाताना मणिपूरच्या जनतेने दाखवलेली दृढता आणि एकता हीच त्यांची खरी ताकद आहे"

"मणिपुरला शांतता आणि बंद- नाकाबंदी यापासून मुक्ती मिळायलाच हवी ."

"मणिपूरला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध"

"ईशान्य प्रदेशाला अॅक्ट ईस्ट धोरणाचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने मणिपूरची महत्त्वाची भूमिका आहे"

"राज्याच्या विकासाच्या प्रवासातले अडथळे आता दूर झाले आहेत आणि पुढील 25 वर्षे मणिपूरच्या विकासाचा अमृत काळ आहेत”

Posted On: 21 JAN 2022 5:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

मणिपूरच्या राज्य स्थापनेची 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेचे अभिनंदन केले आहे. मणिपूरच्या वैभवशाली प्रवासात योगदान दिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या त्यागाला आणि प्रयत्नांना त्यांनी अभिवादन केले.

इतिहासातील चढउतारांना सामोरे जाताना मणिपूरच्या जनतेने  दाखवलेली दृढता आणि एकता हीच त्यांची खरी ताकद आहे" असे त्यांनी नमूद केले. राज्यातील जनतेच्या अपेक्षा आणि आकांक्षा जाणून घेण्यासाठी  सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला, ज्यामुळे त्यांना त्यांच्या भावना आणि अपेक्षा चांगल्या प्रकारे समजून घेता आल्या आणि राज्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करता आल्या. मणिपुरी लोक त्यांची शांततेची  सर्वात मोठी इच्छा पूर्ण करू शकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. "मणिपूरमध्ये  शांतता नांदावी आणि बंद आणि नाकेबंदीपासून मुक्ती मिळायला हवी", असे ते म्हणाले.

मणिपूरला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील महासत्ता बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, मणिपूरच्या मुला-मुलींनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवून दिला आहे आणि त्यांची  आवड आणि क्षमता लक्षात घेऊन राज्यात पहिले भारताचे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. त्यांनी मणिपूरच्या तरुणांच्या स्टार्ट-अप क्षेत्रातील यशाचाही उल्लेख केला. स्थानिक हस्तकलेच्या संवर्धनासाठी सरकारची वचनबद्धता त्यांनी अधोरेखित केली.

"ईशान्य प्रदेशाला  अॅक्ट ईस्ट धोरणाचे केंद्र बनवण्यात  मणिपूर महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. ते म्हणाले, ‘दुहेरी -इंजिन’ सरकारच्या प्रयत्नामुळे मणिपूरला रेल्वेसारख्या बहुप्रतिक्षित सुविधा मिळत आहेत. जिरीबाम-तुपुल-इम्फाळ रेल्वे मार्गासह राज्यात हजारो कोटी रुपयांचे कनेक्टिव्हिटी प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे, इम्फाळ विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे ईशान्येकडील राज्यांचा दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरूशी संपर्क सुधारला आहे. भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग आणि या प्रदेशात आगामी 9 हजार कोटींच्या नैसर्गिक वायू पाइपलाइनचाही मणिपूरला फायदा होईल.

पंतप्रधान म्हणाले की, राज्याच्या विकासाच्या प्रवासातले अडथळे आता दूर झाले आहेत आणि पुढील 25 वर्षे मणिपूरच्या विकासाचा अमृत काळ आहेत. भाषणाच्या शेवटी त्यांनी राज्याच्या डबल-इंजिन विकासासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 

 

 

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791541) Visitor Counter : 177