वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
राष्ट्रीय एक खिडकी योजनेचा वापर मोठ्या संस्था आणि परदेशातील भारतीय मोहिमांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करा – पीयूष गोयल
Posted On:
21 JAN 2022 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2022
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे की एनएसडब्ल्यूएस अर्थात राष्ट्रीय एक खिडकी योजनेमध्ये परिचालनातील सोपेपणा आणि पारदर्शकता यावर भर द्यायला हवा. एनएसडब्ल्यूएस मंचाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून बोलताना गोयल म्हणाले की, एनएसडब्ल्यूएस पोर्टलवर प्रत्येक एकात्मिक मंत्रालयाकडून मिळणाऱ्या एका विषयासाठीच्या परवानगीसाठी संपूर्ण तपासणी प्रक्रिया एकाच वेळी केली गेली पाहिजे.
एनएसडब्ल्यूएसच्या डिजिटल मंचामुळे, गुंतवणूकदारांना विविध परवानगीसाठी स्वतःची ओळख निश्चिती करून देणे आणि अर्ज करणे सोपे झाले आहे. या यंत्रणेमध्ये 32 विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभाग यांची माहिती अंतर्भूत करण्यात आली असून या मंचावर महाराष्ट्रासह एकूण 14 राज्यांसाठी कार्यान्वयन केले जात आहे. आणखी सहा राज्यांना या यंत्रणेत सामावून घेण्याचे काम सुरु आहे.
ते म्हणाले की, मंजुरी प्रक्रिया अधिक वेगवान करून वेळेची बचत करण्यासाठी उत्तम संपर्क सुविधेचे धोरण आखायला हवे. या मंचाविषयी अधिक जागृती निर्माण करण्यासाठी, त्यांनी या मंचाचे सादरीकरण मोठ्या संस्था आणि परदेशातील भारतीय मोहिमांसमोर करण्याचे निर्देश दिले.
एनएसडब्ल्यूएस मंचाची सुरक्षितता आणि संभाव्य धोक्यांपासून संरक्षण यांची विशेष काळजी घेण्याचे काम करण्यासाठी एका मुख्य माहिती सुरक्षा अधिकाऱ्याची नेमणूक केली जावी अशी सूचना केंद्रीय मंत्र्यांनी केली. या व्यवस्थेत तेच प्रयत्न पुनःपुन्हा केले जाणे आणि प्रत्यक्ष संपर्क टाळण्यासाठी गोयल यांनी 19 जानेवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत सांगितले, “जर प्रत्यक्ष संपर्क आणि चर्चा आवश्यक असेल तर अशा वेळी हे काम एनएसडब्ल्यूएस मंचावर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले गेले पाहिजे. दूरदृश्य बैठकीतील चर्चा रेकॉर्ड केल्या जाव्यात आणि दस्तावेजी पुरावे म्हणून सुरक्षित ठेवल्या जाव्यात.”
वापरकर्त्याकडून अभिप्राय जाणून घेण्याच्या महत्त्वावर केंद्रीय मंत्र्यांनी भर दिला. ते म्हणाले, “कालमर्यादा पाळणे अत्यंत महत्त्वाचे असून यंत्रणेच्या सतत केल्या जाणाऱ्या अद्ययावतीकरणातून हे शक्य होऊ शकेल.”
एनएसडब्ल्यूएस मंचावर केवायए (Know Your Approvals) अर्थात ग्राहकांनी मागितलेल्या परवानगीबद्दल जाणून घेण्याची सोय थेट उपलब्ध असून त्यात 32 केंद्र सरकारी मंत्रालये आणि विभागांशी संबंधित 544 प्रकारच्या परवानगीबाबत माहिती घेता येईल. या एनएसडब्ल्यूएस प्रणालीद्वारे माहिती मिळण्यासाठी एकूण 3,259 प्रकारच्या परवानगीची यादी तयार करण्यात आली आहे. येत्या 31 मार्च 2022 पर्यंत 13 मंत्रालये आणि विभाग यांच्याशी संबंधित आणखी 360 प्रकारच्या परवानगी आणि नोंदणी या प्रणालीत समाविष्ट होतील याची सुनिश्चिती करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.
* * *
M.Chopade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1791529)
Visitor Counter : 239