उपराष्ट्रपती कार्यालय

कच्च्या तेलाचे स्वदेशी उत्पादन वाढवून देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन


इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी (IIPE) च्या पहिल्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचे संबोधन

Posted On: 21 JAN 2022 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

उपराष्ट्रपती, श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज देशाची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भक्कम संशोधन आणि विकास प्रयत्नांद्वारे कच्च्या तेलाचे स्वदेशी उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले.

देशाच्या ऊर्जा मिश्रणात ‘आत्मनिर्भर भारताचे’ आवाहन करून, नायडू यांनी पेट्रोलियमचे देशांतर्गत शोध, नवीकरणीय स्त्रोतांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यावर आणि ऊर्जा उद्योगातील उत्कृष्टता आणि नवकल्पना यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुचवले.

भारत कच्च्या तेलाचा जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक आहे आणि तरीही त्याच्या 80 टक्क्यांहून अधिक गरजांसाठी आयातीवर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन श्री नायडू यांनी केवळ परकीय चलन वाचवण्यासाठीच नव्हे तर ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. नवीन क्षेत्रांमध्ये शोध वाढवण्याच्या उद्देशाने हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन लायसन्सिंग पॉलिसी (HELP) सारख्या सरकारच्या विविध धोरणात्मक सुधारणांची त्यांनी माहिती दिली. 

विशाखापट्टणम येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी (IIPE) च्या पहिल्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती संबोधित करत होते. IIPE हे पेट्रोलियम संशोधनासाठी समर्पित विद्यापीठ आहे आणि संसदेच्या कायद्याद्वारे 2017 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून त्याला मान्यता मिळाली. 

वाढत्या ऊर्जेच्या मागणीवर लोकसंख्या आणि औद्योगिकीकरणाचा परिणाम लक्षात घेता, श्री नायडू म्हणाले की, 'भारताची प्राथमिक ऊर्जा मागणी 2045 पर्यंत सरासरी 3% पेक्षा जास्त दराने वाढण्याची अपेक्षा आहे, तर उर्वरित जगाच्या 1% पेक्षा कमी वाढ झाली आहे.'

या संदर्भात, श्री नायडू यांनी पेट्रोलियम क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाच्या पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी आणि बाजारातील प्रमुख उद्योजकांशी उद्योग-संस्थेचे मजबूत संबंध निर्माण करण्यासाठी IIPE आणि इतर ऊर्जा संस्थांना आवाहन केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टानुसार उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर संशोधन करायला आणि शैक्षणिक संशोधनामध्ये बहु-विषय दृष्टिकोन आणण्याला पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची सूचनाही त्यांनी केली. 

 

 

 

* * *

M.Chopade/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791483) Visitor Counter : 205