शिक्षण मंत्रालय

'परीक्षा पे चर्चा 2022' मध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणीची तारीख 27 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे

Posted On: 20 JAN 2022 7:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जानेवारी 2022

 

'परीक्षा पे चर्चाच्या' 5व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करण्याची मुदत 27 जानेवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या एका अनोख्या संवादात्मक कार्यक्रमाची संकल्पना मांडली, ज्यामध्ये आयुष्य हा  एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी  परीक्षेतून उद्‌भवणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी देशभरातील आणि परदेशातूनही विद्यार्थी, पालक, शिक्षक त्यांच्याशी  संवाद साधतात.

या कार्यक्रमाचे स्वरूप 2021 प्रमाणे ऑनलाइन पद्धतीमध्ये प्रस्तावित आहे. इयत्ता 9 ते 12 पर्यंतचे शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांची निवड ऑनलाइन स्पर्धेद्वारे केली जाईल. https://innovateindia.mygov.in/ppc-2022/ वर नावनोंदणी 28 डिसेंबर 2021 ते 27 जानेवारी 2022 पर्यंत सुरु आहे.

 

 

 

 

S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1791281) Visitor Counter : 173