वस्त्रोद्योग मंत्रालय
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग मिशन या पथदर्शी कार्यक्रमाअंतर्गत विशिष्ट धागे आणि जीओटेक्स्टाइल्सशी संबंधित 20 महत्वाच्या प्रकल्पांना वस्त्रोद्योग मंत्रालयाची मंजूरी
स्पेशालिटी फायबर्सच्या 16 प्रकल्पांना मंजूरी, यात पाच आरोग्यक्षेत्रातील, 4 औद्योगिक आणि संरक्षक क्षेत्र, 3 ऊर्जा साठवणूक तसेच 3 वस्त्रोद्योग कचरा पुनर्वापर आणि एक कृषी तसेच चार जीओटेक्स्टाइल्स (पायाभूत) प्रकल्पांचा समावेश
वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षणक्षेत्राची सांगड घालणे आवश्यक- पीयूष गोयल
देशात मोठे संशोधन प्रकल्प आकर्षित करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन समन्वय गरजेचा- गोयल
Posted On:
17 JAN 2022 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2022
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत वस्त्रोद्योग मंत्रालयाने आज 30 कोटी रुपये किमतीच्या 20 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी दिली. स्पेशालिटी फायबर्स, विशिष्ट धागे आणि जिओटेक्टटाईल्स क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत हे प्रकल्प सुरु आहेत.
या 20 संशोधन प्रकल्पात, 16 प्रकल्प, स्पेशालिटी फायबर म्हणजे विशेष धाग्यांचे असून, त्यात पाच प्रकल्प आरोग्य क्षेत्रातले, चार प्रकल्प उद्योग आणि संरक्षक क्षेत्रातील, 3 प्रकल्प ऊर्जा साठवणूक, 3 प्रकल्प वस्त्रोद्योग कचरा पुनर्वापर आणि एक प्रकल्प 1 कृषी क्षेत्र तसेच चार प्रकल्प जिओटेक्स्टटाईल्स (पायाभूत) क्षेत्रातील आहेत.
अनेक भारतीय संस्था, उत्कृष्टता केंद्रे आणि केंद्र सरकारी संस्था- जसे की आयआयटी, डीआरडीओ, बीटीआरए यांचाही यामध्ये सहभाग होता. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी अतिशय महत्वाचे असलेले हे प्रकल्प, आत्मनिर्भर भारताच्या उभारणीलाही बळ देणारे आहेत . विशेषत: आरोग्य, उद्योग- संरक्षक, ऊर्जा साठवणूक वस्त्रोद्योग कचरा पुनर्वापर,कृषी क्षेत्र आणि पायाभूत क्षेत्रातील हे महत्वाचे प्रकल्प आहेत.
यावेळी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधकांच्या समूहाशी संवाद साधतांना, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, की “वस्त्रोद्योग क्षेत्रात संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी उद्योग आणि शिक्षणक्षेत्राची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यासाठी अभ्यासक, वैज्ञानिक आणि संशोधक यांच्यात समन्वय घडवून आणणे, ही काळाची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रकल्पात, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या, उच्च मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यायला हवा, तसेच समस्यांवर विचारमंथन व्हायला हवे, अशी सूचनाही गोयल यांनी केली. त्याशिवाय, देशात मोठे संशोधन प्रकल्प आकर्षित व्हावेत यासाठी आंतर-मंत्रालयीन समन्वय देखील महत्वाचा आहे, असेही गोयल पुढे म्हणाले.
याआधी, वस्त्रोद्योग मंत्रालयाने, 26 मार्च 2021 रोजी, 78.60 कोटी रुपयांच्या 11 संशोधन प्रकल्पांना मंजूरी दिली होती.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790594)
Visitor Counter : 255