विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
"जांभळ्या क्रांती" द्वारे 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "स्टार्ट-अप्स इंडिया" अभियानात जम्मू आणि काश्मीरचेही महत्वपूर्ण योगदान -केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग
पहिला राष्ट्रीय स्टार्ट-अप दिन आज देशभरामध्ये साजरा केला जात आहे
Posted On:
16 JAN 2022 6:58PM by PIB Mumbai
"जांभळी क्रांती" हे "स्टार्ट-अप्स इंडिया" मध्ये जम्मू आणि काश्मीरने दिलेले महत्वपूर्ण योगदान आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, (राज्यमंत्री स्वतंत्र कार्यभार) पृथ्वी विज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण व निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये स्टार्ट अप्स इंडियाचा प्रारंभ केला आणि आज आपण पहिला राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस साजरा करत आहोत, असे सिंग यांनी सांगितले.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) माध्यमातून सुरू केलेल्या सुगंध अभियानाबद्दल त्यांनी माहिती दिली. या अभियानामुळे भारतात सुप्रसिद्ध "जांभळी क्रांती" झाली आहे, असे त्यांनी सांगितले. सीएसायआरने सुरुवातीला डोडा, किश्तवार, राजौरी या जिल्ह्यांमध्ये आणि नंतर रामबन, पुलवामासह इतर जिल्ह्यांमध्ये लागवडीसाठी जम्मू स्थित प्रयोगशाळेच्या साहाय्याने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन्स (IIIM) द्वारे उच्च-मूल्याचे तेल असलेल्या लव्हेन्डर पीकाद्वारे सुरुवात केली,अशी माहिती सिंग यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सीएसआयआरने टप्पा -I पूर्ण झाल्यानंतर सुगंध अभियानाचा टप्पा-II सुरू केला आहे अशी घोषणा डॉ जितेंद्र सिंह यांनी केली. टप्पा- I मध्ये सीएसआयआरने 6000 हेक्टर जमिनीवर लागवड करण्यास मदत केली आणि देशभरातील 46 आकांक्षीत जिल्ह्यांचा समावेश केला. 44,000 हून अधिक लोकांना प्रशिक्षित केले गेले आणि कोट्यवधींची उत्पन्न निर्मिती झाली.
***
S.Bedekar/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1790356)
Visitor Counter : 556