निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशनने एटीएल स्पेस चॅलेंज 2021चे अव्वल संघ जाहीर केले

Posted On: 12 JAN 2022 9:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2022

 

देशभरातील तरुण नवसंशोधकांच्या अभूतपूर्व  प्रतिसादानंतर नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने आज ‘एटीएल  स्पेस चॅलेंज 2021’ चे निकाल जाहीर केले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE)  सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

एटीएल स्पेस चॅलेंजमध्ये देशभरातील एटीएल आणि बिगर -एटीएल विद्यार्थ्यांकडून 2500 हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या, ज्यामधून 75 अव्वल  नवसंशोधकांची आज निवड आणि घोषणा करण्यात आली. हे चॅलेंज हे एक प्रकारचे आव्हान होते आणि पहिल्यांदाच एटीएल चॅलेंज एटीएल आणि बिगर -एटीएल अशा दोन्ही गटातील विद्यार्थ्यांसाठी खुले होते. एटीएल स्पेस चॅलेंज 2021 मध्ये 32 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधून 6500 हून अधिक विद्यार्थी  या स्पर्धेत सहभागी झाले होते.  या स्पर्धेत विद्यार्थिनींचा 35% पेक्षा जास्त सहभाग होता.

ही स्पर्धा 6 सप्टेंबर 2021 रोजी सुरु झाली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशिका ऑनलाइन पोर्टलचा वापर करून पाठवता आल्या, तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रेरित करण्यासाठी AIM-ISRO-CBSE टीमकडून  आभासी YouTube LIVE सत्रे देखील आयोजित केली होती. यातील एकूण 8 प्रेरणादायी/प्रोत्साहनदायी सत्रे शास्त्रज्ञ आणि तज्ञांनी 6 आठवड्यांच्या कालावधीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. अभिनव संशोधन चार व्यापक आव्हान संकल्पनांपैकी  एकावर आधारित प्रवेशिका पाठवायच्या  होत्या.

आज विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात क्षमता निर्मिती कार्यक्रम कार्यालयाचे (ISRO) संचालक  डॉ. सुधीर कुमार यांनी आपल्या भाषणात सांगितले की, एटीएल आणि सीबीएसई बरोबर  सहकार्य करणे हा इसरोसाठी सन्मान आहे. आम्ही 100 एटीएल निवडले आहेत आणि आगामी काळात आम्ही त्यांना इस्रोच्या उर्जेने ऊर्जावान करू. अंतराळ ही एक बहु-शाखीय गोष्ट आहे जी आजूबाजूच्या प्रत्येकाच्या सामाजिक जीवनावर परिणाम करते आणि सामाजिक समस्या अवकाशाद्वारे सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मिळालेल्या प्रवेशांमुळे मी प्रभावित झालो आहे आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांसाठी असे आणखी कार्यक्रम हवे आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांच्या आकांक्षा नवकल्पनांद्वारे पूर्ण केल्या जातील.”

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1789500) Visitor Counter : 245