रेल्वे मंत्रालय
रेल्वेमंत्र्यांनी सर्व रेल्वे झोन/विभागांमध्ये कोविड सज्जतेच्या तयारीचा घेतला आढावा
Posted On:
10 JAN 2022 7:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जानेवारी 2022
संपूर्ण देशभरामध्ये कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विविध रेल्वे झोन आणि विभागांच्या वरिष्ठ अधिका-यांना रेल्वे रूग्णालये आणि सामान्य लोकांसाठी आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचा वापर सुलभ करण्याचे निर्देश दिले. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. त्रिपाठी, मंडळाचे सदस्य आणि रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व विभागीय कार्यालयांचे महा व्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सहभागी झाले होते.

या आढावा बैठकीमध्ये मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोविड सज्जतेशी संबंधित पुढील गोष्टींची तपासणी केली.
- रेल्वे रूग्णालयाची पायाभूत सुविधा
- बालरोग विभागाचे कामकाज
- लसीकरण- रेल्वेमध्ये आघाडीच्या फळीवर कार्यरत असलेल्या कामगारांना खबरदारीची मात्रा देण्याची तरतूद करण्याबरोबरच त्यांच्या मुलांचे आणि रेल्वे कर्मचा-यांचे लसीकरण
- औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा, जिओलाइटचा साठा आणि इतर आवश्यक वैद्यकीय मदत तसेच कोविडच्या उपचारांमध्ये महत्वाची ठरणारी उपकरणे, व्हँटिलेटर, द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन टाकी आणि इतर उपकरणे कार्यरत असल्याची खातरजमा केली.
- जागरूकता निर्माण करणे
- रेल्वे स्थानकावर सर्वांनी मास्कचा वापर करणे, हात स्वच्छ धुणे आणि इतर खबरदारीच्या उपायांविषयी वारंवार घोषणा करण्याचे निर्देश दिले.
- रेल्वे स्थानकावर मास्कशिवाय कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करणे.
- मास्क आणि इतर खबरदारीच्या उपायांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबविणे.
- कोविडच्या सद्यस्थितीमध्ये, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली अथवा रेल्वे स्थानकांवर प्रवासी / प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यास त्यासाठी विशेष स्थानके सुरू करण्याविषयी यावेळी आढावा घेण्यात आला.
* * *
S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1788974)
Visitor Counter : 117