संरक्षण मंत्रालय
हत्येचा किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील इतर पात्र व्यक्तीला कौटुंबिक निवृत्तीवेतन लागू करण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
Posted On:
05 JAN 2022 6:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने 16 जून 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, जर एखाद्या सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याविरोधात, हत्या किंवा आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला गेला असेल, तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील इतर पात्र व्यक्तीला निवृत्तीवेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या माजी सैनिक कल्याण विभागाने आज, म्हणजेच पाच जानेवारी रोजी, आदेश जारी करुन निवृत्तीवेतन आणि निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने जारी केलेल्या निर्देशाचा मूळ गाभा तसाच ठेवून, त्यात गरजेनुसार बदल केले आहेत आणि लष्करी दलातील निवृत्तीवेतन धारकांनाही हा आदेश लागू केला आहे.ही सुविधा 16 जून 2021 पासून, पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787738)
Visitor Counter : 194