कोळसा मंत्रालय
डिसेंबर 2021 मध्ये देशातील एकूण कोळसा उत्पादनात 6.74 % ची म्हणजेच, 74.78 दशलक्ष टनांची वाढ
कॅप्टिव्ह म्हणजेच कंपनीच्या मालकीच्या कोळसा खाणींमधील उत्पादनात 40.98% ची विक्रमी वाढ
Posted On:
05 JAN 2022 4:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2022
डिसेंबर 2021 मध्ये भारताच्या एकूण कोळसा उत्पादनात, गेल्यावर्षी म्हणजे 2019 च्या तुलनेत 6.74 % ची म्हणजेच, 74.78 दशलक्ष मेट्रिक टन इतकी वाढ नोंदवली गेली. डिसेंबर महिन्यातील एकूण उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने 60.220 मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन करत, 3.79% ची वाढ नोंदवली आहे. कॅप्टिव्ह खाणी, म्हणजेच कंपनीच्या मालकीच्या खाणींनी 8.91 मेट्रिक टन इतक्या कोळशाचे उत्पादन करत, 40.98% ची विक्रमी वाढ नोंदवली आहे. त्याचवेळी, सिंगरेनी कोलियरीज लिमिटेड या कंपनीने डिसेंबर महिन्यात केवळ 5.65 मेट्रिक टन कोळसा उत्पादन करत, उणे 1.12% अशी नकारात्मक वाढ नोंदवली आहे.
गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत, डिसेंबर 2021 मध्ये कोळशाच्या पुरवठ्यात 14.62 % पासून 75.05 मेट्रिक टनपर्यंत वाढ झाली आहे. या काळातील एकूण उत्पादनापैकी, कोल इंडिया लिमिटेडने 60.67 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करत, 12.70% ची वाढ नोंदवली आहे. सिंगरेनी कोलियरीज लिमिटेडने 5.70 मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा करत 2.01 टक्के कोळशाची वाढ नोंदवली आहे. तर कॅप्टिव्ह खाणीतून 8.68 मेट्रिक टन कोळसा पुरवठा होऊन, 43.23 टक्के वाढ नोंदवण्यात आले आहे.
वीजेसाठी लागणाऱ्या कोळशात, डिसेंबर 2021 मध्ये, 20.06 % म्हणजे 63.32 मेट्रिक टन इतकी वाढ झाली आहे. 2019 मध्ये हे उत्पादन 52.74 मेट्रिक टन इतके होते.
कोळसा-आधारित म्हणजेच औष्णिक ऊर्जा निर्मितीत डिसेंबर 2021 मध्ये 11.84 % ची वाढ झाली आहे . डिसेंबर महिन्यात एकूण वीजनिर्मिती, 2019 च्या तुलनेत, 8.32% अधिक होती.
देशात कार्यरत प्रमुख 35 कोळसा खाणींपैकी 11 खाणी 100 % पेक्षा अधिक तर 12 खाणींमधील उत्पादन 80 % पेक्षा अधिकमात्र 100 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787703)
Visitor Counter : 231