युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युवक कल्याण विभाग : वर्ष अखेर आढावा
लसीकरण अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी युवा स्वयंसेवकांचा सहभाग : 1.27 कोटी युवा स्वयंसेवकांसमवेत 2.22 लाख उपक्रमांचे आयोजन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत आयोजित केलेल्या सायकल रॅली आणि पद यात्रा याद्वारे 1.59 लाख युवकांनी केला 6.37 लाख किलोमीटरचा प्रवास
राष्ट्रीय पोषण माह- 2021 अंतर्गत सुमारे 8.3 लाख स्वयंसेवकांचा पोषण जागृती अभियानात सहभाग
महिनाभर चाललेल्या स्वच्छ भारत कार्यक्रमात 56.62 लाख युवकांनी 1.07 कोटी किलो टाकाऊ वस्तू/ कचरा केला गोळा
एक भारत श्रेष्ठ भारत यासंदर्भात 4000 अधिक वेबीनार
तीन दिवसांच्या गंगा उत्सवात दीपोत्सव, प्रदर्शने,रक्त दान, सांस्कृतिक कार्यक्रम,मशाल यात्रा यासारख्या कार्यक्रमात युवा स्वयंसेवकांचा यशस्वी सहभाग
Posted On:
28 DEC 2021 9:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 डिसेंबर 2021
युवा कल्याण विभागाच्या 2021 या वर्षातल्या ठळक घडामोडी याप्रमाणे आहेत-
आभासी माध्यमातून (वेबीनार ) एक भारत श्रेष्ठ भारत (ईबीएसबी) कार्यक्रम
नेहरू युवा केंद्र संघटन आणि (एनवायकेएस) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांनी एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमाचे, जोडीच्या राज्यांमध्ये पीपीटी फॉर्मेटचा वापर करत दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजन केले. नेहरू युवा केंद्र संघटनने राष्ट्रीय स्तरावर 7 वेबीनारचे आयोजन केले. राज्यांच्या जोड्यांमध्ये भाषा शिकण्यावरच्या या वेबीनार मध्ये 4,885 युवक सहभागी झाले.
स्तर
|
वेबीनारची संख्या
|
सहभागींची संख्या
|
राष्ट्रीय स्तर
|
7
|
4,885
|
राज्य स्तर
|
179
|
24,624
|
जिल्हा स्तर
|
1,588
|
94,085
|
गट स्तर
|
2,668
|
99,100
|
एकूण
|
4,442
|
2,22,694
|
राष्ट्रीय युवा संसद उत्सव
150 जिल्ह्यांच्या ठिकाणी जिल्हा युवा संसद आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आल्या यात 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 698 जिल्ह्यातून 2,34,428 युवक सहभागी झाले.
1,345 युवांचा सहभाग असलेल्या राज्य युवा संसदेचे आभासी माध्यमातून आयोजन करण्यात आले. प्रत्येक राज्याच्या 84 राज्यस्तरीय विजेत्यांनी, दिल्लीत 11 आणि 12 जानेवारी 2021 ला झालेल्या राष्ट्रीय युवा संसदेत भाग घेतला.
राष्ट्रीय स्तरावरचे सर्वोत्तम वक्ते ठरलेल्या तीनजणांना अनुक्रमे 2 लाख,1.50 लाख आणि 1 लाख रुपयांच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले, त्याचबरोबर त्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना
नेहरू युवा केंद्र संघटनने युवा स्वयंसेवक,युथ क्लबचे सदस्य आणि इतर संबंधितांच्या सहकार्याने वॉकेथॉन, प्रतिज्ञा, महिलांची दुचाकी रॅली यासारखे 16,619 कार्यक्रम आयोजित केले. यामध्ये 13.22 लाख युवक युवक आणि जनताही सहभागी झाली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम – 12 मार्च 2021
- फ्रीडम मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथे साबरमती आश्रमापासून पदयात्रा ( फ्रीडम मार्च ) ला झेंडा दाखवला आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ (India@75) च्या कर्टन रेझर कार्यक्रमांचे उद्घाटन केले.
- यामध्ये सुमारे 81 जण होते, 15 स्थायी पदयात्रीमध्ये नेहरू युवा केंद्र संघटनच्या स्वयंसेवकांचा समावेश होता.
- कुतुब मिनार इथून पद यात्रा : नेहरू युवा केंद्र संघटनने पद यात्रा आयोजित केली त्यामध्ये सुमारे 500 युवा स्वयंसेवक सहभागी झाले.
- किला राय पिथोरा इथे सांस्कृतिक कार्यक्रम :दिल्लीतल्या किला राय पिथोरा इथे पदयात्रेचा समारोप झाला. भारतीय पुरातत्व विभागाने सांस्कृतिक कार्यक्रमांची मालिका आयोजित केली.
- 623 जिल्हा नेहरू युवा केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन : 14.27 लाख युवक विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. सायकल रॅली आणि पद यात्रा यांचे जिल्हा नेहरू युवा केंद्रात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅली आणि पद यात्रा यांच्या 2134 कार्यक्रमांमध्ये1.59 लाख युवकांनी 6.37 लाख किलोमीटर अंतर पार केले.
कोविड लसीकरण अभियान
1.27 कोटी स्वयंसेवकांच्या सहभागाने 2.22 लाख उपक्रमांचे आयोजन लसीकरण उत्सव पासून व्यापक
नेहरू युवा केंद्र संघटनने 11 एप्रिल 2021 ( ज्योतीराव फुले जयंती ) पासून 14 एप्रिल 2021 ( डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती ) पर्यंत व्यापक चाचण्या आणि लसीकरण कार्यक्रम आयोजित केला. 47,638 कार्यक्रम आयोजित केले त्याद्वारे 10.29 लाख लोकांपर्यंत पोहोचून त्यांना कोविड लसीकरणासाठी प्रोत्साहित केले.
कोविड- 19 च्या दुसऱ्या लाटेत नेहरू युवा केंद्र संघटन आणि राष्ट्रीय सेवा योजना यांची सेवा आणि उपक्रम : देशभरात प्रतिबंधात्मक, व्यवस्थापन आणि दिलासादायी उपक्रम
युवा व्यवहार विभागाने नेहरू युवा केंद्र संघटन आणि राष्ट्रीय सेवा योजना द्वारे लसीकरण अभियान आणि नोंदणी, कोविड-19 ला प्रतिबंध करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासह आयईसीई अर्थात माहिती,शिक्षण आणि संवाद कार्यक्रम यासारख्या महत्वाच्या विभागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
युवा योद्धे कार्यक्रमाला युनिसेफचे सहाय्य
युनिसेफच्या सहाय्याने 5,679 आभासी माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून 3,09,850 नेहरू युवा केंद्र संघटन अधिकारी, कोविद योद्धे,युथ क्लबचे सदस्य, गंगा दूत,आपत्ती प्रतिसाद पथक सदस्य आणि देशभरात इतर संबंधीताना प्रशिक्षण देण्यात आले. 2,88,827 युवक आणि इतरांनी युवा योद्धे म्हणून नोंदणी केली. 2,52,604 युवकांनी युवा योद्धे म्हणून प्रतिज्ञा घेतली.
इतर महत्वाचे उपक्रम
- राज्य आणि जिल्हा नेहरू युवा केंद्र संघटन अधिकाऱ्यांचे संपर्क विषयक तपशील कोविड योद्धा पोर्टल वर अद्ययावत करण्यात आले.
- सुमारे 82,381 युवा स्वयंसेवकांना युवा व्यवहार विभागासाठी गव्हर्मेंट ऑनलाईन ट्रेनिंग पोर्टल वर प्रशिक्षण मिळाले.
- जवळजवळ सर्व जिल्ह्यात, नेहरू युवा केंद्र संघटन स्वयंसेवक, घरी फेस मास्क तयार करण्याला प्रोत्साहन, गरजूंना फेस मास्कचे वाटप आणि त्याचा वापर कसा करायचा याबाबत जनतेमध्ये त्याची जागृती करत आहेत.
- देशभरात कोविड-19 संदर्भात 1,91,265 कुटुंबाना, त्यांच्या कुटुंबातल्या वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याबाबत सजग करण्यात आले.
- 89,265 लोकांना, कोविड-19 बाधित कुटुंबाना सहाय्य करण्याबाबत जागृत करण्यात आले.
- विविध ठिकाणच्या गर्दीचे नियोजन आणि विविध सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि ग्राम पंचायती 27,116 स्वयंसेवक आणि नेहरू युवा केंद्र संघटनच्या अधिकाऱ्यांचे सहाय्य घेत येत आहेत.याबरोबरच त्यांनी सार्वजनिक घोषणा, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी उभारलेल्या नियंत्रण कक्षात कामही केले.
- राष्ट्रीय सेवा योजनेच्या 1,27,078 स्वयंसेवकांनी, बँका,रुग्णालयात सोशल डीस्टन्सचे पालन,गरजूंना अन्नवाटप, समाजातल्या वयोवृद्धांना मदत या कमी जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात दिला.
- राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रेरित केल्याने 52.90 लाख लोकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केले. फेस मास्कचे वितरण करण्यासाठीही हे स्वयंसेवक 2.34 कोटी लोकांपर्यंत पोहोचले.
- देशातल्या 2.64 कोटी लोकांपर्यंत हे युनिट पोहोचले.
7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन -21 जून 2021
2021 च्या योग दिनाची संकल्पना : निरोगी राहण्यासाठी योग
एनवायकेएसने, 623 जिल्हा स्तरीय कार्यक्रमाच्या माध्यमातून योग विषयक 2.33 कार्यक्रमांचे आयोजन केले ज्यामध्ये 4.30 कोटी लोकांनी भाग घेतला. देशभरात 17,50,927 एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले.
#Cheer4India Run Tokyo 2020:
एनवायकेएसने,राज्य स्तरीय 20 कार्यक्रमांचे आयोजन केले 11,190 लोक यामध्ये सहभागी झाले. #Cheer4India च्या केलेल्या प्रचाराला ट्वीटरवर 1,58,286 इम्प्रेशन आणि फेसबुक वर 12,499 लाईक मिळाल्या.
1 ते 15 ऑगस्ट 2021दरम्यान स्वच्छता पंधरवडा साजरा –
विविध कार्यक्रमात 14.71 लाख युवक सहभागी झाले. एनएसएसनेही स्वच्छता पंधरवडा साजरा केला. त्यांच्या शैक्षणिक संस्था तसेच आजूबाजूच्या परिसरात,दत्तक खेडी, बागा,झोपडपट्टी विभाग, रुग्णालये यामध्ये स्वच्छता मोहीम आणि स्वच्छता विषयक जागृती कार्यक्रम राबवण्यात आले. देशातल्या 11,311 संस्थांमधून 9,36,656 स्वयंसेवक यामध्ये सहभागी झाले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ‘फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 चे आयोजन ( 13 ऑगस्ट 2021 ते 2 ऑक्टोबर 2021)
देशातल्या 744 जिल्ह्यात 64,699 खेड्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 77,582 दौड मध्ये 4.24 कोटी किमीचे अंतर पार करण्यात आले या दौड मध्ये 57.25 लाख युवक सहभागी झाले.
स्वच्छ भारत कार्यक्रम ( 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021)
केन्द्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रयागराज इथून राष्ट्रव्यापी स्वच्छ भारत कार्यक्रमाचा प्रारंभ केला. 3.31 लाख गावांमध्ये,कचरा गोळा करणे आणि स्वच्छता विषयक 4 लाख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 1.07 कोटी किलोपेक्षा जास्त कचरा एनवायकेएस,युथ क्लबचे सदस्य,स्वयंसेवक आणि समाजातल्या इतर घटकांनी गोळा केला यातल्या 1.05 कोटी किलो कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. 50,000 स्मारके स्वच्छ करण्यात आली आणि स्थळांचा विकास, 25,000 पारंपारिक जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन आणि देखभाल, 83 हजार पेक्षा जास्त शाळा,प्राथमिक आरोग्य केंद्रे,समुदाय स्थळांची स्वच्छता आणि सौंदर्यीकरण करण्यात आले.यामध्ये 56.62 लाख युवकांनी सहभाग घेतला. 21,98,012 एनएसएस स्वयंसेवकांनी, राष्ट्रव्यापी स्वच्छ भारत मोहिमेमध्ये 14,10,750 किलो प्लास्टिक गोळा केले.
जिथे पाऊस पडतो, जेव्हा पडतो,जल शक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियानाच्या सहाय्याने कॅच द रेन प्रकल्प
कॅच द रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा (जानेवारी ते मार्च 2021)
कॅच द रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्याअंतर्गत एनवायकेएस द्वारा 16.31 लाख कार्यक्रमाअंतर्गत 2.27 कोटी नागरिकांचा सहभाग/ त्यांच्यापर्यंत पोहोचले.
एनवायकेने आयोजित केले श्रमदान -
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कॅच द रेन प्रकल्पाअंतर्गत जल संवर्धनाबाबत सामुदायिक कार्य शिबीर आयोजित करण्यात आले त्यामध्ये 1589 कार्यक्रमातून 1,88,813 व्यक्तींना लाभ झाला.
कॅच द रेन प्रकल्पाचा दुसरा टप्पा (ऑक्टोबर 2021 ते जानेवारी 2022 )
कॅच द रेन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्पात एनवायकेएस द्वारा 2.97 लाख कार्यक्रमाअंतर्गत 32.46 कोटी नागरिकांचा सहभाग/ त्यांच्यापर्यंत पोहोचले.
26 नोव्हेंबर 2021 ला संविधान दिन साजरा
26 नोव्हेंबर 2021 ला एनवायकेएसने संविधान दिन साजरा केला. राष्ट्रपतींसह, एनवायकेएसचे 8.85 लाख अधिकारी, युवा स्वयंसेवक,संबंधीतानी, संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
नमामि गंगे मध्ये युवकांचा सहभाग
- 13,778 युवकांच्या सहभागाने 32,437 झाडे लावण्यात आली.
- 83,851 युवकांच्या सहभागाने 5208 स्वच्छता अभियाने चालवण्यात आली.
- 11,007 युवकांच्या सहभागाने, घरोघरी 731 अभियाने चालवण्यात आली.
- एनवायकेएसने 16 ते 31 मार्च 2021 या काळात गंगा स्वच्छता पंधरवडा आयोजित केला 13491युवकांच्या सहभागाने 777 कार्यक्रम आयोजित केले.
- गंगा क्वेस्ट साठीच्या नोंदणीमध्ये एनवायकेएस सहभागी झाले. 1,10,336 जणांची नोंदणी झाली.
- 5 जून 2021 एनवायकेएसने पर्यावरण दिन साजरा केला
4548 झाडे लावण्यात आली. (2994 स्थानिक प्रजाती आणि 1576 औषधी )
- गंगा दशहरा महोत्सवाचे 20 जून 2021 ला आयोजन करण्यात आले. यामध्ये गंगा आरती, पदयात्रा,स्वच्छतेबाबत जागृती, गंगा नदीचे संवर्धन आणि वृक्षारोपण हाती घेण्यात आले.
- 3 दिवसांच्या गंगा उत्सवामध्ये,गंगा दीपोत्सवात 46555 दीप प्रज्वलित करण्यात आले, 42 गंगा प्रदर्शने,42 चित्रकला प्रदर्शने,389 सांस्कृतिक कार्यक्रम, 17 रक्तदान आणि 42 मशाल यात्रा आयोजित करण्यात आल्या , यामध्ये 60071 युवक सहभागी झाले.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (एनएचआरसी) कार्यशाळांचे वेबीनार द्वारा आयोजन
एनएचआरसी- एनवायकेएसने,एनकेवायएस अधिकारी,राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आणि युवा स्वयंसेवक यांच्यासाठी वेबीनारद्वारे 4 राष्ट्रीय मानवाधिकार जागृती कार्यशाळा आयोजित केल्या.यामध्ये 4872 जण सहभागी झाले.
राष्ट्रीय पोषण माह 2021 : पोषण जागृती अभियानात आणि लट्ठ पणा,चमचमीत पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम, डबाबंद अन्नाच्या सेवनाचे आरोग्यावर होणारे परिणाम,सेंद्रिय आहार याविषयीच्या व्याख्यानात 8,28,721 स्वयंसेवक सहभागी झाले.
गांधी जयंती 2021 कार्यक्रम : फिट इंडिया प्लॉग रन, वेबीनार, व्याख्याने, ऑनलाईन निबंध लेखन,चित्रकला,पोस्टर, गांधीवादी तत्वज्ञानावर प्रश्न मंजुषा आणि विविध स्पर्धा घेण्यात आल्या. देशभरातल्या 11,29,892 एनएसएस स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला.
एनएसएस प्रजासत्ताक दिन परेड शिबीर 2021 : एनएसएस प्रजासत्ताक दिन परेड शिबीर 2021 चे नवी दिल्लीत चाणक्यपुरी इथल्या विश्व युवक केंद्रात आणि आंतरराष्ट्रीय युथ होस्टेल वर आयोजन करण्यात आले. या शिबिरात एनएसएस स्वयंसेवकांना, माननीय पंतप्रधान आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याना भेटण्याची संधी प्राप्त झाली.
नेताजी सुभाष चंद्र बोस 125 वी जयंती आणि पराक्रम दिवस 2021 : रॅली, सायक्लोथान, वेबीनार,व्याख्याने,ऑनलाइन निबंध लेखन,पोस्टर स्पर्धा,नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे विचार आणि तत्वज्ञान यावर प्रश्न मंजुषा, रक्त दान, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये 10,52,497 एनएसएस स्वयंसेवक सहभागी झाले.
D.Wankhede/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787518)
Visitor Counter : 335