नागरी उड्डाण मंत्रालय
आगरतळा येथे महाराजा बीर बिक्रम (MBB) विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
एमबीबी विमानतळ आता दरवर्षी 30 लाख प्रवाशांना सेवा देईल
अत्याधुनिक विमानतळ त्रिपुराच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवेल
Posted On:
04 JAN 2022 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराजा बीर बिक्रम (MBB) विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री त्रिपुरा ग्राम समृद्धी योजना आणि 100 विद्याज्योती शाळा प्रकल्प मोहीम ,यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभही त्यांनी केला. यावेळी त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया आणि प्रतिमा भौमिक उपस्थित होते.
नवीन अत्याधुनिक टर्मिनलच्या उद्घाटनामुळे त्रिपुराच्या गौरवशाली इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला असल्याचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी यावेळी सांगितले. एकात्मिक टर्मिनल हे पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचे आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहे. यामुळे राज्य आणि ईशान्य प्रदेशात विकासाची नवी कवाडे खुली होतील, असे ते म्हणाले.
10,000 चौरस मीटर क्षेत्रफळाचा आगरतळा विमानतळ आता 30,000 चौरस मीटरपर्यंत विस्तारला असून त्रिपुराचा सांस्कृतिक वारशाचे दर्शन त्यातून घडेल. महाराजा बीर बिक्रम विमानतळ आता वर्षाला 13 लाखांऐवजी 30 लाख प्रवाशांना सेवा देऊ शकेल. केंद्र सरकारच्या कृषी उडान 2.0 योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2021 मध्ये 4500 किलो कृषी उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे. यात त्रिपुरातील अननस आणि फणसाचा समावेश आहे.
आगरतळा विमानतळ त्रिपुराच्या राजधानीत स्थित ईशान्य भागातील प्रमुख विमानतळांपैकी एक आहे. 4C प्रकारचे विमान कार्यन्वयन हाताळण्याची त्याची क्षमता आहे. इंडिगो, एअर इंडिया, फ्लायबिग या सारख्या विमानकंपन्या इथून सध्या कोलकाता, दिब्रुगढ , गुवाहाटी, इंफाळ, शिलॉन्ग, लेंगपुई, बंगळुरू आणि दिल्ली या ठिकाणांसाठी आठवड्याला 230 उड्डाणे चालवत आहेत.
उपलब्ध प्रमुख सुविधा:
- धावपट्टी (18/36) परिमाणे - 2286m x 45m
- विमान पार्क करण्यासाठी (ऍप्रन)संख्या 04. C प्रकार A-321 आणि 1 क्र. एका वेळी ATR-72 प्रकारचे विमान.
- टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 10725 चौ. मी. 500 प्रवासी हाताळण्यासाठी (250 आगमन + 250 निर्गमन) 1.3 दशलक्ष प्रवासी वार्षिक क्षमतेसह (MPPA).
- एनएव्ही/कॉम.साधने, जसे की ,विमान अवतरण यंत्रणा (ILS), डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओम्नी रेंज (DVOR) इत्यादी उपलब्ध.
- CAT-VII चे ATC नियंत्रण टॉवर तथा तांत्रिक कक्ष आणिअग्निक्षमन स्थानक .
- रात्री विमान उतरवण्याची सुविधा.
- नवीकरणीय ऊर्जेसाठी 2 मेगा वॅट सौर पॅनेल
30,000 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत पूर्ण झाली असून [गर्दीच्या कालावधीत ] 1200 पीक अवर पॅसेंजर (PHP) हाताळण्याच्या क्षमतेसह वार्षिक क्षमता 3 MPPA आहे. A-321 प्रकारच्या विमानांसाठी 6 अतिरिक्त पार्किंग मार्गांसाठी एप्रन. नवीन टर्मिनल इमारत (जीएसटी वगळता) 450 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आली आहे .
वारसा: स्थानिक सांस्कृतिक / वास्तुशास्त्रीय प्रेरणा
a. इमारतीचे गतिमान आणि प्रतिष्ठित स्वरूप त्रिपुरा राज्याच्या डोंगराळ प्रदेशातून प्राप्त झाले आहे.
b. टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागात फुलांच्या नक्षीकामातून बांबूची वास्तुकला या प्रदेशातील जंगले आणि हिरवळीचे चित्रण करणारी आहे .
c. उनाकोटी टेकड्यांवरील स्थानिक आदिवासी दगडी शिल्पे आणि बांबूच्या स्थानिक हस्तकलेचा आतील भागात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.
d. इमारतीच्या आतील भागात कलाकृती आणि शिल्पांद्वारे स्थानिक संस्कृती आणि वास्तुकलाचे चित्रण केले गेले आहे.
आगरतळा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीची छायाचित्रे
टर्मिनल बिल्डिंग- शहराच्या बाजूचे दृश्य
परिसरातील फूड कोर्ट
बांबूच्या कलाकृती दर्शविणारे अंतर्गत दृश्य
बांबूच्या कलाकृती दर्शविणारे अंतर्गत दृश्य
Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1787498)
Visitor Counter : 229