गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह सचिवांकडून गृह मंत्रालया अंतर्गत सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाच्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राची (I4C) माहितीपुस्तिका आणि वृत्तपत्राचे प्रकाशन

Posted On: 03 JAN 2022 8:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2022


केंद्रीय गृह सचिवांनी गृह मंत्रालया अंतर्गत सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाच्या(सीआयएस) भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (I4C) तीन  पुस्तिकांचे आणि एका  वृत्तपत्रिकेचे आज नवी दिल्ली येथे प्रकाशन केले.

  1. सायबर हायजिन फॉर सायबर स्पेस- डूज अँड डोन्ट्स- मूलभूत माहितीपुस्तिका
  2. सायबर हायजिन फॉर सायबर स्पेस- डूज अँड डोन्ट्स- प्रगत माहितीपुस्तिका
  3. त्रैमासिक वृत्तपत्रिका  – सायबर प्रवाह

ही आज प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीपुस्तिका आणि वृत्तपत्रिका आहे

या माहितीपुस्तिकांचे प्रकाशन म्हणजे सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि ग्रामीण भागात, औद्योगिक संस्था आणि सामान्य लोकांमध्ये सायबर स्वच्छता म्हणजे संगणक व्यवहारांची हाताळणी दक्षतेने करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबाबत  जागरुकता निर्माण करण्याचा एक भाग आहे.

सायबर प्रवाह हे त्रैमासिक प्रकाशन 14सी विषयी आणि एप्रिल ते जून 2021 आणि जुलै ते सप्टेंबर 2021 या दोन तिमाहींमधील 14 सीच्या विविध व्यवहारांची, सायबर गुन्ह्यांचा कल/ स्वरुप, आकडेवारी, 14सीमुळे निर्माण झालेल्या सुविधा, तक्रारीसाठी मंच यांची माहिती सर्व संबंधितांना जागरुक करण्यासाठी आणि  सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी, छडा लावण्यासाठी आणि तपासासाठी उपलब्ध करत असते. सायबर गुन्हे आणि सायबर गुन्ह्यांची व्याख्या या क्षेत्रामध्ये होत असलेल्या नवीन घडामोडींबाबत जागरुकता निर्माण करण्याचा देखील या प्रकाशनाचा उद्देश आहे.

सीआयएस विभागांतर्गत 2018 मध्ये केंद्रीय पातळीवरील समन्वय संस्था म्हणून आणि राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना सायबर गुन्ह्यांविरोधातील लढ्यामध्ये सामाईक चौकट उपलब्ध करून पाठबळ देण्यासाठी 14सीची स्थापन करण्यात आली होती. सायबरदोस्त या नावाने विविध समाजमाध्यमांच्या माध्यमातून 14सी जागरुकता निर्माण  करत आहे आणि जनतेला ठराविक काळाने सायबर सुरक्षेच्या टिप्स देत आहे.


* * *

Jaydevi PS/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1787251) Visitor Counter : 236